News Flash

पाकिस्तानच्या हैदर अलीने केला विराट, रोहितला न जमलेला विक्रम

पाकिस्तानचा इंग्लंडवर शेवटच्या षटकात विजय

तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना पाकिस्तानने अवघ्या पाच धावांनी जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. सामन्यात हैदर अली आणि अनुभवी मोहम्मद हाफीज यांनी अर्धशतके ठोकली. १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या मोईन अलीने एकाकी झुंज दिली, पण अखेर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सलग दोन अर्धशतके ठोकणाऱ्या मोहम्मद हाफीजला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले.

पाकिस्तानने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९० धावा कुटल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा हैदर अली याने शानदार अर्धशतक ठोकलं. त्याने ३३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा केल्या. पहिल्या टी२० सामन्यात अर्धशतक ठोकणारा तो पहिलाच पाकिस्तानी खेळाडू ठरला. विराट कोहली, रोहित शर्मासारख्या बड्या खेळाडूंनादेखील हा पराक्रम करता आलेला नव्हता. विराट पदार्पणाच्या सामन्यात २६ धावांवर बाद झाला होता. तर रोहितला पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजीच मिळालेली नव्हती. भारताकडून पदार्पणाच्या टी२० सामन्यात अर्धशतक केवळ अजिंक्य रहाणेने झळकावले होते.

हैदर अली हा पाकिस्तानकडून अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला. याआधी पदार्पणाच्या सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम उमर अमिनच्या नावे होता. त्याने ४७ धावा केल्या होत्या. त्यापाठोपाठ हाफीजने पदार्पणाच्या सामन्यात ४६, तर हुसैन तलतने ४१ धावा केल्या होत्या.

दरम्यान, इंग्लंडसा मिळालेल्या १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांच्या खेळाडूंना मोठी भागीदारी करता आली नाही. मोईन अलीने १९व्या षटकापर्यंत झुंज दिली. पण अखेर तो ६१ धावांवर बाद झाला. त्यामुळे अखेर इंग्लंडला पाच धावांनी पराभूत व्हावं लागलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 12:09 pm

Web Title: haider ali first player to score fifty in t20i debut for pakistan which virat kohli rohit sharma did not manage vjb 91
Next Stories
1 चुरशीच्या लढतीत पाकिस्तानचा विजय; इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड
2 कौतुकास्पद! रोहित पवारांनी युवा कुस्तीपटू सोनालीला दिला मदतीचा हात
3 रैनाच्या माघार नाट्यानंतर अखेर CSKने केलं ट्विट
Just Now!
X