News Flash

हजारे क्रिकेट स्पर्धा २० फेब्रुवारीपासून

‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी शनिवारी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.

 

मुंबई आणि महाराष्ट्राचे सामने जयपूरला

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा सहा शहरांमध्ये २० फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. सर्व संघ १३ फेब्रुवारीला जैव-सुरक्षित वातावरणात दाखल झाल्यानंतर त्यांच्या तीन वेळा करोना चाचणी घेण्यात येणार आहेत.

‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी शनिवारी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. सुरत, इंदूर, बेंगळूरु, कोलकाता आणि  जयपूर या ठिकाणे पाच गटांचे सामने निश्चित करण्यात आले आहेत. तसेच प्लेट गटातील आठ संघ आपापले सामने तामिळनाडूतील विविध मैदानांवर खेळतील. ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार, खेळाडूंना स्पर्धेआधी तीन तसेच बाद फेरीला सुरुवात होण्याआधी तीन वेळा करोना चाचणी करावी लागणार आहे.

’  ‘अ’ गट (सुरत) :  गुजरात, गोवा, चंडीगढ, हैदराबाद, त्रिपुरा, बडोदा

’  ‘ब’ गट (इंदूर) : तामिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश

’  ‘क’ गट (बेंगळूरु) : कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, ओदिशा, रेल्वे, बिहार

’  ‘ड’ गट (जयपूर) : दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पुद्दुचेरी

’  ‘ई’ गट (कोलकाता)  : बंगाल, सेनादल, जम्मू आणि काश्मीर, सौराष्ट्र, हरयाणा

’ प्लेट गट (तामिळनाडू) : आसाम,   उत्तराखंड, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 2:17 am

Web Title: hajare cricket tournaments akp 94
Next Stories
1 राष्ट्रीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
2 अनुभवी शिलेदारांपुढे तेजांकितांची अग्निपरीक्षा!
3 Video: भन्नाट!! इशांतने दोन चेंडूंवर उडवले दोन त्रिफळे
Just Now!
X