भारत विरुद्ध विंडीज यांच्यादरम्यानच्या मालिकेमधील अंतीम म्हणजेच पाचवा सामना त्रिवेंद्रम येथे खेळवला जात आहे. हा सामना सुरु होण्याआधी भारतीय फलंदाजीची भिंत म्हणून कारकीर्द घडणवणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा विशेष सत्कार करुन त्याला ICC च्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला हा सन्मान प्रदान करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारा द्रविड पाचवा भारतीय ठरला. द्रविडचा सन्मान झाल्यानंतर काही वेळातच ICC Hall of Fame आणि Rahul Dravid हे दोन्ही टॉपी ट्विटर टॉप ट्रेण्ड्समध्ये होते. अनेकांनी ट्विटवरून द्रविडचे अभिनंदन करतानाच द्रविडला हा सन्मान देताना थोडा उशीर झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तरी देर आऐ दुरुस्त आऐ असं म्हणत सर्वांनीच द्रविडवर शुभेच्छांचा वर्षाव केला. पाहुयात कोण काय म्हणालं आहे द्रविडला शुभेच्छा देताना…

प्रत्येक अर्थाने महान खेळाडू: अजिंक्य रहाणे</p>

राजस्थान रॉयल्सकडूनही अभिनंदन

राहुल सर तुम्ही फीट बसाल तिथे: हार्दिक पांड्या</p>

तुम्हाला खेळताना पाहण्यापासून तुमच्याकडून शिकण्यापर्यंतचा प्रवास आठवला: क्रृणाल पांड्या

सर्वांसाठीच आदर्श :ऋषभ पंत

क्रीडा मंत्रालयाकडूनही अभिनंदन

याबरोबरच अनेक नेटकऱ्यांनी ट्विटवर राहुल द्रविडला आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या

सर राहुल द्रविड

हॉल ऑफ मेफला वॉल शिवाय अर्थ नाही

क्रिकेटचा सर्वात मोठा दूत

या वॉलमुळे आयसीसीचा हॉल ऑफ फेम शक्तीशाली होईल

निस्वार्थी खेळाडू

सन्मान द्रविडचा सन्मान शिस्तीचा

सचिनचा चाहता आहे पण

हे खूप आधीच व्हायला हवे होते

हे कमावावं लागतं

ICC च्या Hall of Fame च्या यादीमध्ये भारताच्या भिशन सिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर आणि अनिल कुंबळे या चार खेळाडूंनंतर आज द्रविडलाचाही समावेश झाला आहे.