चौकशीनंतर विजेतेपदावर शिक्कामोर्तब
लुइस हॅमिल्टनने इटालियन ग्रां. प्री. शर्यत जिंकून विश्वविजेतेपदाकडे आगेकूच करताना ५३ गुणांची आघाडी घेतली. मात्र, नियमात ठरवलेल्या टायरच्या दबावापेक्षा कमी दबावात हॅमिल्टनने शर्यत जिंकल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आयोजकांनी तपासानंतरग हॅमिल्टनच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. हॅमिल्टनचे हे फॉम्र्युला-वन शर्यतीचे ४०वे जेतेपद आहे.
हॅमिल्टनने ५३ टप्प्यांच्या या शर्यतीत एक तास, १८ मिनिटे व ००.६८८ सेकंदांची वेळ नोंदवून
बाजी मारली. या जेतेपदामुळे हॅमिल्टनच्या खात्यात एकूण २५२ गुण जमा झाले आहेत. वेटेलने २५.०४२ सेकंदांचा अतिरिक्त वेळ घेत दुसरे स्थान पटकावले. विल्यम्सच्या फेलिपे मासा ४७.६३५ सेकंदांचा अतिरिक्त वेळ घेत तिसऱ्या स्थानावर आला. विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत १९९ गुणांसह मर्सिडिजचा निको रोसबर्ग दुसऱ्या स्थानावर, तर १७८ गुणांसह फेरारीचा सेबॅस्टियन वेटेल तिसऱ्या स्थानावर आहे.
हॅमिल्टनसह रोसबर्ग याच्या टायरच्या दबावाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत
आहे. तांत्रिक अधिकारी
जो बॉइर यांनी हॅमिल्टनच्या गाडीचा पुढील डावा टायरमध्ये नियमात लिहिलेल्या दबावापेक्षा
०.३ पीएसआय (पाऊंड्स प्रती चौरस इंच) दबाव कमी होता आणि रोसबर्गच्या गाडीच्या टायरचाही दबाव १.१ पीएसआय कमी असल्याचे नमूद केले
आहे. मात्र, पुरेसे पुरावे
उपलब्ध नसल्यामुळे आयोजकांनी पुढील चौकशी स्थगित केली आणि हॅमिल्टनला जेतेपद बहाल केले.