News Flash

IPL मध्ये कोणत्याही संघाने नाही केलं खरेदी, हनुमा विहारी आता ‘या’ स्पर्धेत खेळताना दिसणार

लिलावात हनुमा विहारीवर एकाही संघाने नव्हती लावली बोली

टीम इंडियाचे बहुतांश खेळाडू उद्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. टेस्ट स्पेशलिस्ट अशी ओळख असलेला चेतेश्वर पुजाराही यंदा चेन्नईकडून आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. पण, टीम इंडियाच्या कसोटी संघाचा मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी मात्र आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.

आयपीएलच्या १४ व्या सत्रासाठी झालेल्या लिलावात हनुमा विहारीवर एकाही संघाने बोली लावली नाही. त्यामुळे तो आयपीएलचा भाग नसेल. एक कोटी इतकी त्याची बेस प्राईस होती. अशात विहारीने भविष्याच्या दृष्टीकोनातून तयारी सुरू केली असून तो आता इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

हनुमा विहारी इंग्लंडचा काउंटी संघ वारविकशायरकडून (Warwickshire) खेळताना दिसेल. यासाठी विहारी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्याआधी किमान तीन काउंटी सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभव विहारीला मिळू शकतो. विहारीच्या आधी चेतेश्वर पुजाराही काउंटीमध्ये खेळला होता.

दरम्यान, हनुमा विहारीने यापूर्वी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. तो २०१९ मध्ये अखेरचा आयपीएल सामना खेळला होता. पण त्यानंतर मात्र कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 9:34 am

Web Title: hanuma vihari who went unsold in ipl auction set to play for warwickshire ahead of indias tour of england sas 89
Next Stories
1 … अन्यथा भारतातील विश्वचषक अमिराती अथवा न्यूझीलंडमध्ये!
2 भारताची अर्जेंटिनावर सरशी
3 भारताच्या ज्युदो संघाची ऑलिम्पिक पात्रता फेरीतून माघार
Just Now!
X