News Flash

HBD Pujara: BCCIने केला पुजाराचा सन्मान; बहाल केली मानाची पदवी

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या पुजारावर शुभेच्छांचा वर्षाव

चेतेश्वर पुजारा

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. १-१ अशा बरोबरीत असलेल्या कसोटी मालिकेत चौथा सामना भारताने जिंकला आणि यजमानांचा अबाधित गड सर केला. त्या सामन्यात अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण संपूर्ण मालिकेत भारतासाठी अभेद्य भिंत बनून उभा राहिला तो चेतेश्वर पुजारा. त्याने चौथ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा मारा शरीरावर झेलत २००हून अधिक चेंडू खेळले. त्याच्या चिवट खेळीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा माराही फिका पडला. शरीराच्या विविध अवयवांवर चेंडूचा मारा सहन करत त्याने धडाकेबाज खेळी केली. त्याचं हे रूप पाहून BCCIने त्याला खास पदवी बहाल केली.

चेतेश्वर पुजाराचा आज वाढदिवस. आज पुजाराने ३४व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त BCCIने पुजाराला एक पदवी बहाल करत त्याचा सन्मान केला. “हा खेळाडू शरीरावर वेगवान चेंडूंचा मारा सहन करतो, तरीदेखील खेळपट्टीवर खंबीरपणे तळ ठोकून उभा राहतो. हा खरा धाडसी खेळाडू आहे. ८१ कसोटी सामने, ६ हजार १११ धावा, १३ हजार ५७२ चेंडू आणि १८ शतकं ठोकणाऱ्या भारतीय संघाचा ‘आधारस्तंभ’ (Mr. Dependable) चेतेश्वर पुजारा याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”, असं ट्विट BCCIने केलं.

इतर सहकाऱ्यांनीही दिल्या शुभेच्छा-

चौथ्या कसोटीच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चेतेश्वर पुजारावर अनेक प्रहार करण्याचे प्रयत्न केले. पण कांगारुंच्या शरीरभेदी माऱ्याला पुजारा पुरून उरला. मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि कॅमरॉन ग्रीन या ऑस्ट्रेलियाच्या चार वेगवान गोलंदाजांनी सातत्याने पुजाराच्या शरीराच्या जवळपास मारा केला. चेंडूला मिळणारी उसळी पाहता अनेक चेंडू पुजाराने अंगावर खाल्ले. स्वत:ची विकेट वाचवताना कधी खांद्याजवळ, कधी हाताच्या बोटावर तर कधी हेल्मेटवर चेंडू आदळला. पण एखाद्या भिंतीप्रमाणे अभेद्य असा तो यजमान संघापुढे उभा राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 1:45 pm

Web Title: happy birthday cheteshwar pujara bcci virat kohli cricket fraternity pour wishes see comedy tweets vjb 91
Next Stories
1 ‘त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त’…ऋषभ पंतचं महत्त्वाचं विधान
2 भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय द्रविडला दिलं जात असतानाच, द्रविड म्हणतो…
3 मेलबर्नच्या शतकाने विजयाची पायाभरणी!
Just Now!
X