14 July 2020

News Flash

Happy Birthday Jinx : विराटकडून अजिंक्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अजिंक्य साजरा करतोय ३२ वा वाढदिवस

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करतो आहे. कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज अशी दुहेरी भूमिका सांभाळणाऱ्या अजिंक्यने आतापर्यंत अनेकदा मैदानात आपली चमक दाखवली आहे. फलंदाजीचं तंत्र, फटके खेळण्याची पद्धत या सर्व गोष्टींमुळे अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या साथीदाराला त्याच्या वाढदिवसानिमीत्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट सामने बंद आहेत. भारतीय खेळाडू या काळात आपल्या घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजिंक्यही आपली पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासोबत घरात वेळ घालवत आहे. आपल्या मुलीसोबत खेळतानाचे फोटो, व्हिडीओ अजिंक्य सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकत्यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत अजिंक्यने आपली चमक दाखवली होती. आयपीएलच्या तेराव्या हंगामात अजिंक्य दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार होता. मात्र करोनामुळे बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2020 4:34 pm

Web Title: happy birthday jinx indian skipper virat kohli wishes ajinkya rahane on his 32nd birthday psd 91
Next Stories
1 रोहितच्या तिसऱ्या द्विशतकादरम्यान पत्नी झाली होती भावूक, कारण…
2 राहुल द्रविडने उधळली विराटवर स्तुतीसुमनं, म्हणाला…
3 सरदार पहली बार नमाज पढने आया है, अब अल्लाह उनकी पहली सुनेगा !
Just Now!
X