News Flash

सचिन, विराटसह क्रिकेटविश्वातून पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा

पंतप्रधान मोदी यांचा आज ७०वा वाढदिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजपाकडून देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या प्रमुख राज्यांसह इतर राज्यांमध्येही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. गरजूंना मदत, रक्तदान शिबिरं, नव्या योजनांची सुरुवात, विविध समाजोपयोगी अभियान अशा विविध कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 2:51 pm

Web Title: happy birthday pm modi virat kohli sachin tendulkar lead wishes vjb 91
Next Stories
1 VIDEO : भन्नाट! सामन्याच्या पहिल्याच दोन चेंडूवर स्टार्कने ‘असे’ घेतले दोन बळी
2 ENG vs AUS: करोनानंतर प्रथमच इंग्लंडचा मालिका पराभव; ऑस्ट्रेलिया विजयी
3 अस्थिर वेळापत्रकामुळे सरावावर परिणाम -गोपीचंद
Just Now!
X