भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माचा आज वाढदिवस. आपल्या धडाकेबाद फलंदाजीने गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणारा रोहित आज ३२ वर्षांचा झाला. रोहितच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात असेच काही खास विक्रम..

एकदिवसीय सामन्यांमधील विक्रम

१)
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
१३ नोव्हेंबर रोजी रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये २६४ धावांची खेळी केली. ही कोणत्याही क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यामध्ये केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

२)
याच सामन्यात त्याने शेन वॉटसनच्या नावावर असणारा एकाच डावात चौकार आणि षटकारांच्या मदतीने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडला. या सामन्यात त्याने २६४ पैकी १८६ धावा चौकार आणि षटकाराच्या मदतीने केल्या होत्या.

३)
२६४ धावांच्या खेळीमध्ये रोहितने चक्क ३३ चौकार मारले. एकाच डावात कोणत्याही खेळाडूने मारलेले हे सर्वाधिक चौकार आहेत.

४)
११ ऑक्टोबर २०१५ रोजी कानपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना १५० धावांची खेळी केली. ही कानपूरमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

५)
एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने एकाच डावात १६ षटकार मारले होते.

६)
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू
१२ जानेवारी २०१६ रोजी रोहित शर्माने पर्थच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना नाबार १७१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियन मातीवर कोणत्याही परदेशी खेळाडूने केलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. या खेळीने रोहितने व्हीवी रिचर्डसन यांचा ३६ वर्ष जुना विक्रम मोडला. रिचर्डसन यांनी १९७९-८० मध्ये ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर नाबाद १५३ धावांची खेळी केली होती.

७)
१३ डिसेंबर २०१७ रोजी रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात नाबाद २०८ धावांची खेळी करत तीसऱ्यांदा २०० धावांची खेळी केली. असा पराक्रम करणारा रोहित एका एकमेव खेळाडू आहे.

८)
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा दीडशे धावा करणारा खेळाडू
रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांमध्ये सात वेळा दीडशेहून अधिक धावांची खेळी केली आहे. हा विक्रम करताना त्याने सचिन तेंडुलकर आणि डेविड वॉर्नरचा विक्रम मोडला.

९)
एकाच एकदिवसीय सामन्यांमध्ये दीडशे धावा आणि तीन झेल पकडणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू

१०)
सर्वात कमी सामन्यांमध्ये २०० षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. १ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याने का विक्रम केला.

११)
कर्णधार म्हणून खेळताना द्विशतक करणारा दुसरा भारतीय खेळाडू. विरेंद्र सेहवागने रोहित आधी हा पराक्रम केला होता.

१२)
कमीत कमी डावांमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार करणार पहिला भारतीय सलामीवीर

१३)
कमीत कमी डावांमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार करणार सलामीवीर. रोहितने ५००० हजार धावांचा पल्ला १०२ डावांत पूर्ण केला तर हाच पल्ला दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम अमलाने १०० डावांमध्ये केला

१४)
कमीत कमी डावांमध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार करणार पहिला भारतीय सलामीवीर

१५)
कमीत कमी डावांमध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार करणार सलामीवीर. रोहितने ५००० हजार धावांचा पल्ला ८३ डावांत पूर्ण केला तर हाच पल्ला दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम अमलाने ७९ डावांमध्ये केला

१६)
२०१७ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये एकाच डावात सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू (धावा २०८ नाबाद)

१७)
२०१८ मध्ये एकदिवसीय सामन्यांत सर्वोच्च धावसंख्या करणारा भारतीय खेळाडू (धावा १६२)

१८)
२०१७ मध्ये एकदिवसीय सामन्यांत सर्वोच्च धावसंख्या करणारा भारतीय खेळाडू (धावा २०८ नाबाद)

१९)
२०१६ मध्ये एकदिवसीय सामन्यांत सर्वोच्च धावसंख्या करणारा भारतीय खेळाडू (धावा १७१ नाबाद)

२०)
२०१५ मध्ये एकदिवसीय सामन्यांत सर्वोच्च धावसंख्या करणारा भारतीय खेळाडू (धावा १५०)

२१)
२०१४ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये एकाच डावात सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू (धावा २६४)

२२)
२०१४ मध्ये एकदिवसीय सामन्यांत सर्वोच्च धावसंख्या करणारा भारतीय खेळाडू (धावा २६४)

२३)
२०१३ मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये एकाच डावात सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू (धावा २०९)

२४)
२०१३ मध्ये एकदिवसीय सामन्यांत सर्वोच्च धावसंख्या करणारा भारतीय खेळाडू (धावा २०९)

२५)
विरोधी संघाहून अधिक धावसंख्या करण्याचा पराक्रम रोहित शर्माने दोनदा केला आहे.

टी-२० सामन्यांमधील विक्रम

१)
६ नोव्हेंबर २०१८ रोजी रोहितने ६१ चेंडूमध्ये १११ धावांची खेळी केली. या शतकाबरोबरच टी-२० मध्ये ४ शतके ठोकणारा पहिला खेळाडू ठरला.

२)
२ ऑक्टोबर २०१५ ला रोहित शर्मा टी-२० मध्ये शतक ठोकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. हा पराक्रम रोहितआधी सुरेश रैनाने केला होता.

३)
टी-२० मध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा भारतीय खेळाडू. रोहितने २२ डिसेंबर २०१७ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळताना ११८ धावांची खेळी केली होती.

४)
एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० मध्ये शतक ठोकणारा दुसरा भारतीय खेळाडू. रोहितआधी हा पराक्रम सुरेश रैनाने केला.

५)
रोहित शर्मा हा कर्णधार म्हणून टी-२० सामन्यात शतक ठोकणारा एकमेव खेळाडू आहे.

६)
२२ डिसेंबर २०१७ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळताना रोहित शर्माने अवघ्या ३५ चेंडूमध्ये शतक ठोकले. टी-२०मधील हे सर्वात वेगवान शतक आहे. डेविड मिलर आणि रोहत शर्मा दोघांच्या नावे हा विक्रम असून दोघांनीही ३५ चेंडूत शतक ठोकले आहे.

७)
श्रीलंकेविरुद्धच्या ११८ धावांच्या खेळीमधील ९१.५२ टक्के म्हणजे १०८ धवा रोहितने या चौकार, षटकरांच्या मदतीने केल्या. टी-२०मध्ये सर्वाधिक धावा चौकार षटकारांच्या मदतीने करण्याचा हा विक्रम आहे. (३० हून अधिक धावांच्या खेळीत)

८)
टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय खेळाडू

९)
टी-२० सामन्यांमध्ये ३०० हून अधिक षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू

१०)
२०१८ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये दुसरी सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू (धावा १११ नाबाद)

११)
२०१७ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये दुसरी सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू (धावा ११८ नाबाद)

१२)
२०१७ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा भारतीय खेळाडू (धावा ११८ नाबाद)

१३)
२०१५ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये तिसरी सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू (धावा १०६)

१४)
२०१५ मध्ये टी-२० सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा भारतीय खेळाडू (धावा १०६)

१५)
एकाच टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारणार भारतीय खेळाडू (१० षटकार)

१६)
एकाच टी-२० सामन्यात सर्वाधिक चौकार मारणार भारतीय खेळाडू (१२ षटकार) हा पराक्रम रोहितने एकदा नाही तर दोनदा केला आहे.

१७)
टी-२० सामन्यांमध्ये चार किंवा त्याहून अधिक शतके ठोकणारा पहिला खेळाडू

१८)
वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० सामन्यांमध्ये चार शतके ठोकणारा एकामेव खेळाडू

१९)
टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावांची खेळी करणारा खेळाडू (१९ वेळा)

२०)
टी-२० सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून दोन शतके ठोकणारा एकमेव भारतीय खेळाडू

२१)
एकाच टी-२० सामन्यामध्ये १०० हून अधिक धावा आणि तीन झेल पकडणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू

२२)
टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू.

२३)
टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणार भारतीय खेळाडू.

२४)
टी-२० सामन्यांमध्ये १०० षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू.

२५)
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये १०० षटकार मारणारा रोहित शर्मा तिसरा खेळाडू आहे. याआधी हा परक्रम क्रिस गेल आणि मार्टीन गुप्टीलच्या नावावर आहे.