19 October 2019

News Flash

#HappyBirthdayRahulDravid : BCCI ने द्रविडला दिल्या खास शुभेच्छा, पाहा Video

पाकिस्तानविरुद्धची त्याची एक खेळी BCCI ने व्हिडिओमधून ट्विट केली आहे

क्रिकेट विश्वात राहुल द्रविड हा Perfect Gentleman म्हणून ओळखला जातो. तो सदैव त्याच्या शांत आणि सुस्वभावी वतर्णुकीमुळे मैदानात आणि मैदानाबाहेर प्रसिद्ध आहे. महान क्रिकेटपटू भारताला सामने जिंकवून देतात. तसेच त्यानेही आपल्या कारकिर्दीत भारताला अनेक सामने जिंकवून दिले. पण महत्वाचे म्हणजे अनेकदा भारत पराभवाच्या छायेत असताना तो भारत आणि पराभव यांच्यात भिंत म्हणून उभा राहिला. त्याच्या वाढदिवसानिमित्त द्रविडला BCCI ने खास शुभेच्छा दिल्या आहेत.

BCCI ने राहुल द्रविडच्या कारकिर्दीतील विविध क्षणाचा एक सुंदर व्हिडीओ तयार केला असून तो आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओ पोस्टबरोबरच BCCI ने संदेश लिहिला आहे आणि त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताच्या क्रिकेटच्या ‘भिंती’ला शुभेच्छा! आपण त्याला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील योगदानासाठी ओळखतो. पण त्याने निर्धारित षटकांच्या सामन्यातदेखील चांगली कामगिरी केली आहे. त्यापैकी पाकिस्तानविरुद्धची त्याची एक खेळी BCCI ने व्हिडिओमधून ट्विट केले आहे.

First Published on January 11, 2019 6:58 pm

Web Title: happybirthdayrahuldravid bcci wishes rahul dravid with special video