23 November 2017

News Flash

हरभजनने ‘त्या’ चुकांसाठी मागितली बायकोची माफी

सर्वांच्यासमोर त्याने स्टेजवरच पत्नी गीता बसराची माफी मागितली.

लोकसत्ता ऑनलाईन | Updated: April 21, 2017 4:32 PM

आपल्याकडून अनावधानाने किंवा जाणूनबुजून आजवर चुकीचे बोललो असेन तर त्याबद्दल मी मनापासून गीताची माफी मागू इच्छितो

अफलातून फिरकीने भल्याभल्यांची दांडी गुल करणारा हरभजन सिंग त्याच्या पत्नीसमोर स्टेजवरच भावूक झाला. नुकतेच एका टेलिव्हिजन वाहिनीवरील ‘नच बलिये’ या डान्स शोमध्ये हे दोघं विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. क्रिकेटचे मैदानात गाजवलेल्या हरभजनने यावेळी गीतासोबत डान्सफ्लोअर देखील गाजवला. दोघांनी एक खास परफॉरमन्स सादर केला. पण या शोमधील स्पर्धक सिद्धार्थ आणि तृप्ती जाधव यांच्या सादरीकरणानंतर हरभजन भावूक झाला. एका गंभीर आजाराला सामोरी जाणारी पत्नी आणि आपल्या पत्नीला सदैव खूष ठेवण्यासाठीची पतीची धडपड, अशा विषयावर सिद्धार्थ आणि तृप्ती जाधव यांचा परफॉरमन्स सादर करण्यात आला. या परफॉरमन्सवर हरभजनचे डोळे पाणावले. त्याने थेट स्टेज गाठले आणि सिद्धार्थ-तृप्तीचे कौतुक केलेच, पण सर्वांच्यासमोर त्याने पत्नी गीता बसराची माफी मागितली.

 

आपल्याकडून अनावधानाने किंवा जाणूनबुजून आजवर चुकीचे बोललो असेन तर त्याबद्दल मी मनापासून गीताची माफी मागू इच्छितो, असे हरभजनने अतिशय भावूक होऊन सांगितले. हरभजनच्या या पुढाकारावर उपस्थितांनी त्याचे कौतुक म्हणून टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
‘नच बलिये’ सीझन ८ चे कपल्स आपल्या धमाकेदार डान्स परफॉर्मन्सनी प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या या शोने टीआरपीत टॉप १० मध्ये जागा मिळवली आहे. हरभजनने यावेळी सेटवर खूप धमाल मस्ती केली. त्याने गीतासोबत डान्स तर केलाच पण सोनाक्षीसोबतही एक सुरेख डान्स केला. याशिवाय, हरभजनने गीताला आपल्या अनोख्या अंदाजात प्रपोज देखील केले होते.

First Published on April 21, 2017 4:32 pm

Web Title: harbhajan singh had an apology for his wife geeta basra on the sets of nach baliye