News Flash

IPL Auction : अखेर भज्जीला ‘या’ संघानं घेतलं ताफ्यात

अनुभवी हरभजन सिंग यानं आयपीएलमध्ये १५० बळी घेण्याची किमया साधली आहे

आयपीएलच्या लिलावात भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याच्यावर पहिल्या फेरीमध्ये बोली लागली नव्हती. मात्र, दुसऱ्या फेरीअखेर कोलकाता संघानं हरभजन सिंगला आपल्या संघात स्थान दिलं आहे. ४० वर्षीय हरजभन सिंग याला मूळ किंमत म्हणजेच दोन कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. गतवर्षी हरभजन सिंग यानं वयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर चेन्नईनं भज्जीला करारमुक्त केलं होतं.

१३ वर्षांपासून आयपीएल खेळणाऱ्या हरभजन सिंग यानं मुंबई आणि चेन्नई अशा दोन संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. भज्जी संघात असताना दोन्ही संघानं चार वेळा आयपीएलच्या चषकावर नाव कोरलं आहे. भज्जी आपल्या आयपीएल कारकिर्दीत तिसऱ्यांदा आयपीएलच्या लिलावात उतरला. हरभजन सिंग यानं २००८ पासून २०१७ पर्यंत मुंबईच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. मागील तीन वर्षांपासून भज्जी धोनीच्या चेन्नईच्या संघात होता. त्यावेळी सीएसकेनं दोन कोटी रुपयामध्ये त्याला खरेदी केलं होतं. हरभजन सिंगने २०१९ मध्ये सीएसकेकडून खेळताना ११ सामन्यात १६ बळी घेतले होते. २०२० मध्ये दुबईत झालेल्या आयपीएलमध्ये वयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती. आता भज्जी तिसऱ्या संघाकडून खेळणार आहे.

४० वर्षीय हरभजन सिंगनं ट्विट करत सीएसकेसोबतचा प्रवास संपुष्टात आल्याचं सांगितलं होतं. ट्विटमध्ये भज्जी म्हणाला होता की, ‘‘सीएसके सोबतचा माझा करार संपुष्टात आला आहे. या संघासोबत खेळण्याचा मिळालेला शानदार अनुभव आणि मित्र, कायमच आठवणीत राहतील. चेन्नई, संघ व्यवस्थापन, कर्मचारी आणि चाहत्यांसोबत दोन वर्ष आनंदात गेले. ऑल द बेस्ट!’’

अनुभवी हरभजन सिंग यानं १६० आयपीएल सामन्यात १५० बळी घेण्याची किमया साधली आहे. १८ धावा देत ५ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 8:11 pm

Web Title: harbhajan singh moves to kkriders nck 90
टॅग : IPL 2021
Next Stories
1 पुजारा कसोटीवर खरा उतरला; या संघाने लाखो रुपयांना घेतलं विकत
2 IPL Auction : कृष्णप्पा गौतमने केला विक्रम; चेन्नईने घेतलं विकत
3 मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबे राजस्थानच्या ताफ्यात
Just Now!
X