भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी नुकतीच एका भारतीय प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट यातला फरक, भारताचे क्रिकेट प्रशिक्षक म्हणून वाट्याला आलेली कारकीर्द आणि त्यातील अनुभव तसेच कसोटी क्रिकेटचे भविष्य अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला फटकेबाज फलंदाजपासून ते संयमी मॅच-फिनिशर बनवण्यात त्यांचा असलेला वाटा त्यांनी या मुलाखतीत सांगितला. यावर फिरकीपटू हरभजन सिंग याने सडकून टीका केली आहे.

धोनी नव्हे, ‘हा’ खेळाडू पुन्हा टीम इंडियात हवा; रोहितने व्यक्त केली इच्छा

धोनी हा सुरुवातीला एक युवा खेळाडू म्हणून मैदानात उतरला, त्यावेळी तो फटकेबाज खेळी करण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेपार व्हायला हवा असाच त्याचा फलंदाजी करताना मानस असायचा. पण त्यांच्यातील प्रतिभा ओळखून मी त्याला हवाई फटकेबाजी करण्याऐवजी मैदानी फटके खेळण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे तो एक यशस्वी मॅच-फिनिशर म्हणून नावारूपाला आला, असे ग्रेग चॅपल यांनी मुलाखतीत सांगितले.

IPL : “तेव्हा धोनी अंपायरशी तावातावाने भांडला अन्…”

त्यांच्या या वक्तव्यानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने त्यांच्यावर जोरदार टीका केली. “धोनीला मैदानालगतचे फटके खेळण्याचा सल्ला चॅपल यांनी या कारणासाठी दिला कारण त्यावेळी ते इतरांना मैदानाबाहेर उडण्याच्या प्रयत्नात होते. त्या काळात चॅपल यांचे काही निराळेच खेळ (संघातील राजकारण) सुरू होते. ग्रेग (चॅपल) यांच्या काळात भारतीय क्रिकेटने सर्वात घाणेरडे दिवस पाहिले”, असे ट्विट करत हरभजनने चॅपल यांना खडे बोल सुनावले.

तेव्हा मी COOL होतो… धवनने शेअर केला जुना फोटो

“भारतच कसोटी क्रिकेट वाचवू शकतो”

“भारत हाच कसोटी क्रिकेटचा तारणहार आहे. ज्यावेळी भारत आशा सोडून देईल, तेव्हा कसोटी क्रिकेट संपेल. केवळ भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तीनच देश सध्या नव्याने क्रिकेटमध्ये येणाऱ्या खेळाडूंना कसोटी खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. टी २० क्रिकेटला माझा विरोध अजिबातच नाही. पण कसोटी क्रिकेटसाठी कोणी पटकन प्रायोजकत्व देण्यास तयार होत नाही. चाहतेदेखील अनेकदा त्याकडे पाठ फिरवतात. भविष्यात ही समस्या वाढताना दिसेल. अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ‘कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट’ असं म्हणतो म्हणूनच आता भारताकडून आशा आहेत”, असे चॅपल म्हणाले.