07 August 2020

News Flash

यशासाठी कठोर परिश्रम हाच पर्याय – रहाणे

कसोटी क्रिकेट परत सुरू झाले, ही आनंदाची बाब

संग्रहित छायाचित्र

क्रिकेटमध्ये भवितव्य घडवायचे असेल तर संधी भरपूर आहेत. मात्र त्यासाठी जिद्द, खेळावर प्रेम, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. मी याच मार्गाचा अवलंब केल्यामुळे इतकी मजल मारू शकलो, असे मत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले.

करोनाच्या संकटामुळे क्रिकेटमधील बदलांविषयी रहाणे म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेट परत सुरू झाले, ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मदानात उतरल्याशिवाय याबद्दल सांगता येणार नाही. मात्र बदल नक्कीच झालेले असतील. टाळेबंदीदरम्यान मी नियमितपणे पहाटेपासून घरात योगा व व्यायाम करतो. तसेच टाळेबंदीमुळे घरच्यांना वेळ देता आला. पत्नीकडून खाद्यपदार्थही बनवायला शिकलो.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:34 am

Web Title: hard work is the key to success ajinkya rahane abn 97
Next Stories
1 रद्द होऊनही विम्बल्डनकडून बक्षिसाची रक्कम
2 हॉकी अध्यक्षांचा राजीनामा
3 रोनाल्डो, मेसी आमने-सामने?
Just Now!
X