13 December 2017

News Flash

परिणीती चोप्राचं कोडं आणि हार्दिक पांड्याचं अफलातून उत्तर

हार्दिक पांड्या सध्या श्रीलंकेत

लोकसत्ता टीम | Updated: September 3, 2017 5:47 PM

हार्दिक पांड्या आणि परिणीती चोप्रा

फिल्मस्टार आणि क्रिकेटपटूंमधले प्रेमसंबंध आता आपल्याला काही नवीन राहिले नाही. फार जून्या काळापासून मन्सूर अली खान पतौडी-शर्मिला टागोर, मोहम्मद अझरुद्दीन-संगीता बिजलानी अशी अनेक उदाहरणं आपण पाहत आलो आहोत. अलिकडच्या काळात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि फिल्मस्टार अनुष्का शर्मा यांच्यातले प्रेमसंबंधही चांगलेच गाजताना दिसतायत. या यादीमध्ये आता प्रियांका चोप्राची बहिण परिणीती चोप्रा आणि भारताचा नवोदीत खेळाडू हार्दिक पांड्या यांची भर पडतेय की काय, अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत.

सध्या हार्दिक पांड्या श्रीलंकेत आहे. यावेळी परिणीती चोप्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांना एक कोडं घालण्याचा प्रयत्न केला.

परिणीतीने आपल्या फोटोतून घातलेल्या कोड्याला हार्दिक पांड्याने खास आपल्या शैलीत उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

हार्दिक पांड्याच्या या उत्तराला परिणीती चोप्रानेही तितक्याच हजरजबाबी पद्धतीने उत्तर दिलं.

मात्र यानंतर काही तासांमध्ये परिणीती चोप्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये ‘Xiaomi’ या स्मार्टफोन कंपनीचा नवीन फोन लाँच करण्यासाठी आपण ते कोडं घातलं असल्याचं परिणीतीने स्पष्ट केलं. त्यामुळे अचानक सोशल मीडियावर सध्या परिणीती चोप्रा आणि हार्दिक पांड्याच्या या सवाल-जबाबाची चांगलीच चर्चा आहे.

First Published on September 3, 2017 5:47 pm

Web Title: hardik pandya and pariniti chopra conversation on twitter gets good response