News Flash

हार्दिक-नताशाकडे ‘गोड’ बातमी; विराट, रवी शास्त्रींसह अनेकांनी दिल्या शुभेच्छा

हार्दिकने रविवारी इन्स्टाग्रामवरून दिली 'गुड न्यूज'

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच हे लवकरच आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी रविवारी हार्दिकने इन्स्टाग्रामवरून दिली. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट केले आणि गोड बातमी सांगितली. या फोटोंपैकी एका फोटोमध्ये हार्दिकने घरच्या घरी लग्न केल्याचाही फोटो शेअर केला आहे, पण त्याबद्दल त्याने माहिती दिली नाही. मात्र पत्नी नताशा गरोदर असल्याचे त्याने इन्स्टाग्रामवरून सांगितले.

हार्दिक-नताशाने लॉकडाउनमध्ये गुपचूप उरकलं लग्न?

हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा हिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नताशा गरोदर असून हार्दिकने अगदी प्रेमाने तिच्या पोटाजवळ हात धरून ते दोघे आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली. हार्दिकने लिहिले आहे की मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास उआनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत, असेही त्याने कॅप्शनमध्ये नमूद केले.

त्यानंतर हार्दिक-नताशावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या.

भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने १ जानेवारी २०२० ला आपली प्रेयसी नताशा स्टॅन्कोविच हिच्याशी साखरपुडा केला. तेव्हापासून तिचं नाव सगळीकडे चांगलंच चर्चेत होतं. नताशा जरी मूळची सर्बियन असली तरी सध्या ती मुंबई-स्थित मॉडेल आहे. नताशा अभिनेत्री बनण्यासाठी २०१२ साली मुंबईमध्ये आली. प्रसिद्ध संगीतकार बादशाहच्या ‘डीजेवाले बाबू’ या म्युझिक व्हिडीओमुळे ती अधिक प्रकाशझोतात आली. हार्दिक आणि नताशा रिलेशनशीपमध्ये आहेत अशी चर्चा गेले अनेक दिवस होती. १ जानेवारी २०२० रोजी या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी नात्याला आकार दिला. मात्र अद्याप हार्दिक-नताशा लग्न कधी उरकलं याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 10:59 am

Web Title: hardik pandya announces wife natasa stankovic pregnancy virat kohli ravi shastri leads wishes vjb 91
Next Stories
1 …म्हणून धोनीच्या निवृत्तीबद्दलचं ट्विट केलं डिलीट – साक्षी
2 क्रीडाक्षेत्रात खळबळ… सुवर्णपदक विजेत्या माजी बॉक्सरला करोनाची लागण
3 दुर्दैवी! आफ्रिकेच्या माजी कर्णधाराचा आजच झाला होता विमान अपघातात मृत्यू
Just Now!
X