20 September 2020

News Flash

भावा, तुझा अभिमान वाटतो ! कृणाल पांड्याचं ‘हार्दिक’ अभिनंदन

कृणाल पांड्याला टी-२० संघात स्थान

कृणाल व हार्दिक पांड्या (संग्रहीत छायाचित्र)

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीदरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे हार्दिकला संपूर्ण स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली. यानंतर गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मात्र हार्दिक पांड्याचा भाऊ कृणालने मात्र भारतीय संघात जागा मिळवली आहे. ही बातमी ऐकल्यानंतर हार्दिकने आपला व कृणालचा एक फोटो शेअर करत, कृणालचं अभिनंदन केलं आहे.

बीसीसीआयने शुक्रवारी रात्री विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी आणि आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दोन्ही संघांमध्ये कृणाल पांड्याला जागा मिळाली आहे. कृणालने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे, याचसोबत स्थानिक क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी चांगली झालेली आहे. सध्याच्या घडीला कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे फिरकीपटू संघात असताना कृणाल पांड्याला संघात जागा मिळण्याची शक्यता कमीच वाटत आहे.

विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलिल अहमद, उमेश यादव, शाहबाज नदीम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलिल अहमद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 5:03 pm

Web Title: hardik pandya has a sweet message for brother krunal on being selected in indias t20i squads
Next Stories
1 धोनीचं करिअर संपलेलं नाही – निवड समिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद
2 Pro Kabaddi Season 6 : जयपूर पिंक पँथर्सच्या घरच्या मैदानावरचे सामने पंचकुलात हलवले
3 IND vs WI : वय वर्ष ३७, FIT and FINE! धोनीचा हा झेल एकदा पाहाच
Just Now!
X