माणंसाकडून चुका होतातच, त्या आपण घेऊन न बसता पुढे गेले पाहिजे असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी राहुल-पांड्या वादावर व्यक्त केले आहे. ‘कॉफी विथ करण’ या मुलाखतीच्या शो दरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर चौकशी संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. करण जोहरच्या या कार्यक्रमात महिला आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. यानंतर बीसीसीआयनं दोन्ही क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत भारतात बोलावलं. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही खेळाडू कोणत्याच प्रकारचं क्रिकेट खेळू शकणार नाहीत. हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर सर्व बाजूने टीकेचा भडीमार सुरू असतानाच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या दोघांची पाठराखण केली आहे. माणसांकडून चुका होतात, त्यांना पुन्हा संधी द्यायला हवी असे गांगुली म्हणाला आहे.
(आणखी वाचा : पांड्या, राहुलची संघवापसी लांबली; सुप्रीम कोर्टात सुनावणी स्थगित )
सध्याच्या क्रिकेटपटूंनी बोलताना सावध राहिलं पाहिजे का? या प्रश्नावर बोलताना गांगुली म्हणाला की, ‘ माणसांकडून चुका होतात, त्यामुळे आपण आता पुढे गेलं पाहिजे आणि या चुका पुन्हा होणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, मी तो कार्यक्रम बघितला नाही. पण फक्त सध्याच्या क्रिकेटपटूंनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. प्रत्येकजण आयुष्यात चुका करतोच. राहुल-पांड्याचा वाद ताणण्यात अर्थ नाही. ‘
(आणखी वाचा : हार्दिक-राहुलला पुन्हा संधी द्यायला हवी – श्रीसंत )
पुढे बोलताना गांगुली म्हणाला की, आपण मशीन नव्हे माणूस आहे, त्यामुळे चुका होतात. चुका सुधारण्याची संधी आपण दिली पाहिजे. या सगळ्या वादानंतर चूक त्यांच्या लक्षात येईल आणि ते आणखी चांगली माणसं म्हणून समोर येतील असेही गांगूली म्हणाला. राहुल-पांड्या दोघंही जबाबदार व्यक्ती आहेत. दोघंही अनेकांचे रोल मॉडेल आहेत. खेळाडूंवर प्रत्येकवेळी चांगल्या प्रदर्शनाचा दबाव असतो. काही चुका आयुष्यात होतात, त्या घेऊन बसण्यापेक्षा सोडून दिलेल्या बऱ्या, असं सल्ला गांगुलीने दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 6:34 pm