News Flash

प्रेमाची कबुली ! हार्दिक पांड्याला ‘या’ अभिनेत्रीनं केलं क्लीन बोल्ड, पाहा फोटो

हार्दिक खेळासोबतच त्याच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो

दुखापतीमुळे भारतीय क्रिकेटपासून अनेक दिवसांपासून दूर असेलला हार्दिक पांड्या सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. हार्दिक पांड्याने इस्टाग्रामवर अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक हिच्याबरोबर फोटो पोस्ट केला आहे. नताशासोबत हातात हात धरून फोटो शेअर केलेला हा फोटो पाहून त्यांनी आपल्या नात्याची पुष्टी केल्याचे म्हटले जात आहे. हार्दिकने हा फोटो शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

 

View this post on Instagram

 

Starting the year with my firework

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

फोटो शेअर करताना करत हार्दिक पांड्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या फायरवर्कसोबत नवीन वर्षाची सुरुवात.” यासह हार्दिकने हृदयाची इमोजीही तयार केली आहे. हार्दिकच्या या फोटोवर युजवेंद्र चहल, अर्जुन कपूर, पंखुरी शर्मा, सिद्धेश लाड, पूर्णा पटेल, सोफी चौधरी, क्रिस्टल डिसूझा यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.

या फोटोनंतर हार्दिक आणि नताशाचे नाते अधिकृत मानले जात आहे. ऑगस्ट 2019 पासून हार्दिक आणि नताशाविषयीच्या बातम्यांना ऊत आला आहे. दोघांना बर्‍याचदा एकत्र पाहिले गेलेय.काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार हार्दिकने दोन दिवसांपूर्वी नताशाला आपल्या कुटुंबाशी ओळख करुन दिली आहे.

 

हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर नताशासाठी मतंही मागितली होती. नताशा हिने छोट्या पडद्यावरील नच बलिये या शोमध्ये सहभाग घेतला होता. तसेच हार्दिक पांड्याच्या वाढदिवसाला नताशाने सोशल मीडियावर हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली होती. दोघांनी दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघेही डेटिंग करत असल्याची चर्चा होती.

दरम्यान, हार्दिक पांड्याचे नाव यापूर्वी अभिनेत्री इशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम यांच्याशी जोडले गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 2:37 pm

Web Title: hardik pandya makes relationship with actress natasa stankovic official on new year 2020 nck 90
Next Stories
1 आजच्याच दिवशी मोडला होता आफ्रिदीच्या वेगवान शतकाचा विक्रम
2 ऑलिम्पिक आणि बरंच काही..
3 पश्चिम भारत  पॉवरलिफ्टिंग स्पर्धा : महाराष्ट्राला घवघवीत यश
Just Now!
X