06 March 2021

News Flash

हार्दिकने नताशाला दिलं खास गिफ्ट, पाहा Photo

नताशाने गुरूवारी दिला गोंडस बाळाला जन्म

भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर गुरूवारी हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा खूप गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांना ही गोड बातमी सांगितली. ज्युनियर पांड्याला जन्म देणाऱ्या नताशासाठी हार्दिकने एक खास गिफ्ट दिलं.

हार्दिकने बाबा झाल्यानंतर दोन दिवसांनी बाळाचा फोटो पोस्ट केला होता. हार्दिकने हातात बाळ घेऊन उभा असल्याचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता हार्दिकने एक विशेष फोटो शेअर केला. या फोटोत तो नताशासोबत हॉस्पिटल रूममध्ये होता. हार्दिकने नताशा खास गुलांबाचा मोठा बुके (पुष्पगुच्छ) भेट दिला. त्या फोटोसोबत त्याने एक कॅप्शनदेखील लिहिली. “माझ्या गुलाबासाठी (नताशा) हे गुलाब. मला आयुष्यातील सर्वात छान गिफ्ट दिल्याबद्दल थॅक्यू”, अशा भावना हार्दिकने त्या फोटोसोबत शब्दातून व्यक्त केल्या.

 

View this post on Instagram

 

Roses for my rose Thank you for giving me the best gift ever

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची बातमी लॉकडाउन काळात दिली होती तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. बाबा झाल्यानंतर हार्दिकने लगेचच वडिलांची कर्तव्यं पार पाडण्याची सुरूवात केली होती. हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला होता. त्यात तो कार चालवत असून बाजूच्या सीटवर डायपरचा बॉक्स ठेवलेला दिसला. त्या फोटोखाली त्याने गर्लफ्रेंड नताशाला टॅग केले. आणि बाळाचे डायपर्स आणतोय असं मजेशीर कॅप्शन लिहिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 12:14 pm

Web Title: hardik pandya natasa stankovic baby boy emotional instagram message post best gift ever roses see photo vjb 91
Next Stories
1 IPL : रोहितला ‘हे’ दोन निवृत्त क्रिकेटर पुन्हा हवे आहेत संघात
2 IPL 2020 : २० ऑगस्टनंतर युएईला जाण्याची संघांना परवानगी – BCCI अधिकाऱ्यांची माहिती
3 IPL 2020 चे सर्व सामने रात्री साडेसात वाजता, माजी भारतीय खेळाडू म्हणतो हाच निर्णय कायम ठेवा
Just Now!
X