News Flash

हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; फोटो केला शेअर

हार्दिकने स्वत: फोटो शेअर करत दिली गोड बातमी

भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आज हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा खूप गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांना ही गोड बातमी सांगितली.

हार्दिक-नताशा आई-बाबा झाले असले तरी त्यांनी लग्न केले आहे की नाही याबाबत अद्याप हार्दिकने स्पष्ट केलेले नाही. हार्दिकने नताशा गरोदर असल्याचे फोटो शेअर केले होते. त्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये हार्दिकने घरातच एक धार्मिक विधी केल्याचा फोटो पोस्ट केला होता. पण त्याबद्दल त्याने अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाही.

हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची बातमी दिली होती तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने लिहिले होते की मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत, असेही त्याने कॅप्शनमध्ये नमूद केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 4:07 pm

Web Title: hardik pandya natasa stankovic blessed with baby boy see photo vjb 91
Next Stories
1 Video : “युवराजच्या ‘त्या’ प्रश्नाचं माझ्याकडे आजही उत्तर नाही”
2 मॅच फिक्सिंग प्रकरण : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या बंदीच्या शिक्षेत घट
3 Coronavirus : जागतिक क्रमवारीतील ‘नंबर १’ अ‍ॅशले बार्टीची US Openमधून माघार
Just Now!
X