गेले काही दिवस भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण तो त्याच्या ‘लव्ह लाईफ’मुळे जोरदार चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवरून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या नावाची घोषणा केली आहे. ती म्हणजे अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक… हार्दिकने नताशाला एका प्रायव्हेट बोटीवर समुद्राच्या मधोमध अतिशय रोमँटिक प्रकारे प्रपोझ केलं आणि तिला अंगठी घालत आपण ‘एन्गेज’ झाल्याचं सांगितलं.
हार्दिकची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच आहे तरी कोण?
हार्दिक पांड्या नेहमी आपल्या मैत्रीणींसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. हार्दिकच्या आयुष्यात कुठली नवी तरुणी डोकावतेय याबाबत कायम उलट सुलट चर्चा क्रिकेट रसिकांमध्ये सुरू असते. पण हार्दिकने नताशासोबतचा फोटो टाकून थेट चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने थेट नताशाला अंगठी देत तिला आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडलं. नताशानेदेखील या ‘रोमँटिक प्रपोझल’चा व्हिडीओ शेअर केला आहे.
पहा भन्नाट व्हिडीओ – …अन् गोलंदाजानेच केला धोनी-स्टाईल रन-आऊट
कृणाल पांड्याने केलं अनोखं स्वागत
हार्दिकच्या साखरपुड्याची ही बातमी सर्वत्र पसरली. त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. क्रिकेट विश्वातूनच नव्हे तर इतर क्षेत्रांतूनही हार्दिकवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. या दरम्यान हार्दिकचा भाऊ आणि भारतीय फिरकीपटू कृणाल पांड्या याने त्या उभयतांना शुभेच्छा दिल्या. त्यातच आपली होणारी वहिनी नताशा हिला त्याने अनोख्या शुभेच्छा दिल्या. “हार्दिक आणि नताशा स्टॅन्कोविच, तुम्हां दोघांचे खूप खूप अभिनंदन. नताशा, आमच्या ‘क्रेझी’ कुटुंबात तुझं स्वागत आहे. वेडेपणा करण्यासाठी तुझं स्वागत आहे. तुम्हां दोघांना खूप खूप प्रेम”, अशा शब्दात कृणाल पांड्याने नताशा वहिनींचं अनोखं स्वागत केलं.
दरम्यान, फोटो शेअर करताना हार्दिक पांड्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मै तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्थान!” फोटोनंतर हार्दिक आणि नताशाचे हे विवाहबंधनात कधी अडकणार याकडे साऱ्या चाहत्यांचे लक्ष लागले आहेत. हार्दिक पांड्याचे नाव या आधी अभिनेत्री इशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम यांच्याशीही जोडले गेले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 2, 2020 4:44 pm