News Flash

हार्दिक-नताशाच्या साखरपुड्यावर विराट म्हणतो…

हार्दिकने १ जानेवारीला केलं नताशाला प्रपोझ

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेले काही दिवस दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण तो त्याच्या ‘लव्ह लाईफ’मुळे जोरदार चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवरून आपल्या होणाऱ्या पत्नीच्या नावाची घोषणा केली आहे. ती म्हणजे अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक… हार्दिकने नताशाला एका प्रायव्हेट बोटीवर समुद्राच्या मधोमध अतिशय रोमँटिक प्रकारे प्रपोझ केलं आणि तिला अंगठी घालत आपण ‘एन्गेज’ झाल्याचं सांगितलं.

 

View this post on Instagram

 

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 01.01.2020 #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on


हार्दिक पांड्या नेहमी आपल्या मैत्रीणींसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. हार्दिकच्या आयुष्यात कुठली नवी तरुणी डोकावतेय याबाबत कायम उलट सुलट चर्चा क्रिकेट रसिकांमध्ये सुरू असते. पण हार्दिकने नताशासोबतचा फोटो टाकून थेट चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने थेट नताशाला अंगठी देत तिला आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडलं. नताशानेदेखील या ‘रोमँटिक प्रपोझल’चा व्हिडीओ शेअर केला आहे.

विराटने दिल्या स्पेशल शुभेच्छा

हार्दिकच्या साखरपुड्याची ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. क्रिकेट विश्वातूनच नव्हे तर इतर क्षेत्रांतूनही हार्दिकवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. यात कर्णधार विराट कोहली याच्या स्पेशल शुभेच्छा खास चर्चेत राहिल्या. “H, तुझं अभिनंदन. ही बातमी खरंच खुप आनंदादायी सर्प्राईझसारखी आहे. तुम्हां दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा”, अशा शब्दात विराटने त्याला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, फोटो शेअर करताना हार्दिक पांड्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मै तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्थान!” फोटोनंतर हार्दिक आणि नताशाचे हे विवाहबंधनात कधी अडकणार याकडे साऱ्या चाहत्यांचे लक्ष लागले आहेत. हार्दिक पांड्याचे नाव या आधी अभिनेत्री इशा गुप्ता, उर्वशी रौतेला आणि एली अवराम यांच्याशीही जोडले गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 10:41 am

Web Title: hardik pandya natasha stankovic engagement virat kohli reaction special congratulations vjb 91
Next Stories
1 भारताला World Cup जिंकवून देणाऱ्या खेळाडूवर एका वर्षाची बंदी
2 आम्ही संधी दिली म्हणून विराट कोहली यशस्वी – कृष्णम्माचारी श्रीकांत
3 …नाहीतर माझं काही खरं नाही ! टीम इंडियाच्या गोलंदाजाला सतावतेय चिंता
Just Now!
X