05 March 2021

News Flash

ऑस्ट्रेलियानं दंगा केला, तरीही हार्दिक पांड्या नाबाद ठरला!

नो बॉलवरील झेलनंतर ऑस्ट्रेलियाने धावबादचे अपील केले होते.

हार्दिक पांड्याचा नो बॉलवर झेल घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावबादची अपील केली होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अखेरच्या षटकात पांड्याचा झेल आणि त्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावबादची अपील केल्याचे पाहायला मिळाले. सामन्यातील ४८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने रिचर्ड्सनच्या गोलंदाजीवर हवेत चेंडू मारला. स्मिथने हा झेल सहज टिपला. हा चेंडू नो बॉल असू शकतो हे लक्षात येताच स्मिथनं पांड्याला धावबाद करण्याची धडपड केली. मात्र त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला. यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडू डेड झालेला नसल्याचे सांगत धावबादसाठी दाद मागताना दिसले. पण पंचानी हे अपील फेटाळून लावले.

पांड्याला नो बॉलमुळे झेल बाद दिले नाही हे सर्वांना मान्य असेल. मात्र क्रिकेटच्या नियमावलीत नो बॉलवर फलंदाज धावबाद ठरतो. त्यामुळे पंचानी ऑस्ट्रेलियन संघावर अन्याय केला का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. मात्र पंचानी ऑस्ट्रेलियावर संघावर कोणताही अन्याय केलेला नाही. कारण क्रिकेटच्या नियमावलीनुसारच पंचानी हार्दिक पांड्याला नाबाद दिले.

काय सांगतो आयसीसीचा नियम

“क्रिकेटच्या नियमावलीतील २७.७ नुसार जर गैरसमजातून फलंदाज मैदान सोडत असेल तर पंच हस्तक्षेप करून फलंदाजाला थांबवू शकतात. शिवाय हा चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करू शकतात. याच नियमाच्या आधारावर आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याला नाबाद ठरवण्यात आले.” त्यानंतर पावसाने खेळामध्ये व्यत्यय आणला. त्यानंतर साधारण १५ मिनिटांनी खेळाला पुन्हा सुरुवात झाली. विशेष म्हणजे रिचर्ड्सनचा चेंडू डेड बॉल घोषित करण्यात आल्यावर नियमाप्रमाणे पुढचा चेंडू हार्दिक पांड्याने खेळणे अपेक्षित होते. मात्र पावसानंतर भुवनेश्वरने हा चेंडू खेळल्याचे पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 8:37 pm

Web Title: hardik pandya no ball wicket run out catch smith controversy india australia
Next Stories
1 भारतीय हॉकीसंघ सर्वात भक्कम, पाकिस्तान प्रशिक्षकांची कबुली
2 विराट पुन्हा झाला ‘नर्व्हस नाईंटी’चा शिकार!
3 जपान ओपन बॅडमिंटन – कॅरोलिना मरीनकडून सायना नेहवाल पराभूत
Just Now!
X