भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेतून मुकावे लागणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला या मालिकेतून बाहेर जावे लागले आहे. त्याच्या जागी रवींद्र जाडेजा याला संघात स्थान देण्यात आले आहे.
NEWS: Hardik Pandya ruled out of Paytm Australia’s tour of India due to lower back stiffness. @imjadeja has been named replacement for Hardik Pandya for the 5 ODIs #AUSvIND pic.twitter.com/l8DUOuDlU3
— BCCI (@BCCI) February 21, 2019
गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पांड्या विविध विषयांमुळे चर्चेत होता. सर्वात आधी आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर दीर्घकाळ तो दुखापतीने ग्रस्त होता. अखेर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला पुनरागमनाची संधी मिळाली. पण त्यानंतर ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याच्यावर आणि लोकेश राहुलवर बंदी घालण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून लोकपालाची नेमणूक न करण्यात आल्यामुळे त्यांच्यावरील बंदी तात्पुरती उठवण्यात आली होती.
बंदी उठवल्यानंतर हार्दिक न्यूझीलंड दौऱ्यात खेळला. तसेच त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी निवड करण्यात आली होती. पण पाठीच्या दुखापतीमुळे आता त्याला स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे. त्याच्या जागी एकदिवसीय मालिकेसाठी रवींद्र जाडेजाची निवड करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 2:57 pm