भारताचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्या संकटात सापडेल्या भरातीय संघासाठी तुफानी फलंदाजी करत आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३७५ धावांचा पाठलाग करणाऱ्या भरतीय संघाची सुरुवात खराब झाली. मयंक अग्रवाल, कर्णधार विराट कोहली, श्रेअस अय्यर आणि राहुल झटपट बाद झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. भारतीय संघासमोर मोठ्या पराभवाच संकट हार्दिक पांड्यानं तुफानी फलंदाजी करत मिटवलं आहे. (आणखी वाचा : रोहित शर्माचे ३० कोटींचे आलिशान घर पाहिलेत का?)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिक पांड्यानं पाचव्या क्रमांकावर तुफानी फलंदाजी करत आपल्या नावावर एक विक्रम केला आहे. पांड्यानं भारताकडून सर्वाधिक वेगवान एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हार्दिक पांड्यानं केदार जाधवचा विक्रम मोडला आहे. हार्दिक पांड्यानं ८५७ चेंडूमध्ये १०० धावांचा टप्पा पार केला आहे. केदार जाधवनं ९३७ चेंडूत एक हजार केल्या होत्या. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान एक हजार धावा करण्याचा विक्रम विडिंजच्या आंद्रे रसेलच्या नावावर आहे. रसेलनं ७६७ धावांत एक हजार धावा चोपल्या आहेत. ल्यूक राँची दुसऱ्या, आफ्रिदी तिसऱ्या आणि अँडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर आहे.

४ बाद १०० धावा अशा बिकट अवस्थेत असणाऱ्या भारतीय संघासाठी हार्दिक पांड्या धावून आला. हार्दिकनं ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पांड्यानं धवनसह पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. हार्दिक पांड्या सध्या ६७ चेंडूत ८१ धावांवर खेळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya score fastest 1000 runs in odi cricket for india nck
First published on: 27-11-2020 at 16:46 IST