क्रिकेटर हार्दिक पांड्या भारतीय संघातील आघाडीचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. हार्दिक त्याच्या खेळाप्रमाणेच सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्यसोबतचे अनेक फोटो हार्दिक सोशल मीडियावर शेअर करत असतो. खास करून मुलगा अगस्त्यसोबत हार्दिकचा चांगला बॉण्ड असून लाडक्या लेकासोबत धमाल करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हार्दिक चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

नुकताच हार्दिकने आपल्या मुलाचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने आपल्या मुलाकडून एका क्रिकेटरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवया मुलगा अगस्त्य या खेळाडूचा मोठा चाहता असल्याचं तो कॅप्शनमध्ये म्हणालाय. आज श्रीलेंकेचा खेळाडू लसिथ मलिंगाचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने हार्दिकने मित्र असलेल्या लसिथचा आणि आपल्या मुलाचा एक खास फोटो शेअर केलाय. यात हार्दिकने अगस्त्यला लसिथच्या केसांप्रमाणे कुरळ्या केसांचा विग घातल्याचं दिसतंय. यात अगस्त्य खूपच गोड दिसतोय. हे कोलाज शेअर करत हार्दिक कॅप्शनमध्ये म्हणाला, “हॅपी बर्थडे मली. तुझ्या एका मोठ्या चाहत्याकडून”. या पोस्टमधून हार्दिकने त्याचा मुलगा लसिथ मलिंगाचा चाहता असल्याचं म्हंटलंय.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: हार्दिक पंड्याने ‘सल्लागार धोनी’ला दिलं चेन्नईच्या विजयाचं श्रेय
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई

हार्दिकने शेअर केलेलं अगस्त्य आणि मलिंगाचं हे कोलाज सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. अनेक नेटकऱ्यांनी या फोटोत अगस्त्य खूपच क्यूट दिसत असल्याचं म्हंटलंय. हार्दिकने शेअर केलेल्या या फोटोला काही तासातच सात लाखांहून अधिक लाइकस् मिळाले आहेत.
आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या लसिथ मलिंगाने IPLमध्ये मुंबई इंडियन्स टीममधून चमकदार कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या टीमला चार वेळा विजेतेपद मिळवून देण्यात मलिंगाचा मोलाचा वाटा राहिला आहे. मलिंगाने फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.