एअरथिंग्ज मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा

प्राथमिक फे रीत नवव्या क्र मांकावर समाधान मानावे लागल्यामुळे चॅम्पियन्स बुद्धिबळ टूर एअरथिंग्ज मास्टर्स ऑनलाइन स्पर्धेतील भारतीय ग्रँडमास्टर पी. हरिकृ ष्णचे आव्हान संपुष्टात आले आहे.

हरिकृ ष्णने १० सामने बरोबरीत सोडवले, तर एक हार पत्करली. त्यामुळे त्याच्या खात्यावर फक्त पाच गुण जमा होते. मॅक्सिम व्हॅचिअर-लॅग्रेव्ह (फ्रोन्स) आणि डॅनिल दुबोव्ह (रशिया) यांच्या खात्यावरही तितके च गुण जमा होते. परंतु एकाही विजयाची नोंद न करता आल्यामुळे तो आगेकू च करण्यात अपयशी ठरला. या स्पर्धेतील अव्वल आठ जणांनी बाद फे री गाठली.

भारताचा द्वितीय क्रमांकावरील बुद्धिबळपटू हरिकृष्णने नवव्या, १०व्या आणि ११व्या डावात अनुक्र मे लेव्ह अरोनियन, वेस्ले सो आणि टिमॉर रॅडजाबोव्हशी बरोबरी साधली. त्याने या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखून लक्ष वेधले होते.