26 February 2021

News Flash

हरमनप्रीत कौरच्या पायाला दुखापत, इंग्लंड दौऱ्यातून माघार

नवोदीत हरलिन देओलला संघात स्थान

घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध मालिकेआधी भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का बसला आहे. उप-कर्णधार हरमनप्रीत कौर पायाला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेली आहे. 22 फेब्रुवारीपासून भारतीय महिला मुंबईत इंग्लंडविरुद्ध 3 वन-डे तर 4 मार्चपासून गुवाहटीत 3 टी-20 सामने खेळणार आहे. हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत सराव सामन्यात आश्वासक खेळी करणाऱ्या हरलिन देओलला संघात स्थान देण्यात आलेलं आहे.

पटीयाला येथे सरावादरम्यान हरमनप्रीतच्या पायाला दुखापत झालेली आहे. त्यामुळे ती आता बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपल्या फिटनेसवर भर देणार आहे. टी-20 मालिकेपर्यंत हरमनप्रीतच्या दुखापतीत सुधारणा न झाल्यास स्मृती मंधानाकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 10:36 am

Web Title: harmanpreet kaur ruled out of england series with ankle injury
टॅग : Harmanpreet Kaur
Next Stories
1 अंबाती रायुडूची विश्वचषक संघातली जागा पक्की !
2 अबब ! एकाच डावात 23 षटकार, विंडीजच्या फलंदाजांची विक्रमी खेळी
3 पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावर दादा म्हणतोय…
Just Now!
X