News Flash

Womens T20 World Cup : भारतीय संघाची घोषणा, हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व

मराठमोळी स्मृती मंधाना संघाची उप-कर्णधार

भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे आगामी महिला टी-२० विश्वचषकाच्या भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने रविवारी १५ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली. बंगालची तडाखेबाज फलंदाज रिचा घोष हा भारतीय संघातला एकमेव नवीन चेहरा असून, २१ फेब्रुवारीला भारतीय महिला संघ सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला सामना खेळतील.

याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या शेफाली वर्मालाही भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिलांची अ गटात निवड झाली असून त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेश यांचं आव्हान असणार आहे.

टी-२० विश्वचषकासाठी असा असेल भारतीय महिलांचा संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, जेमायमा रॉड्रीग्ज, हरलीन देओल, दिप्ती शर्मा, वेदा कृष्णमुर्ती, रिचा घोष, तानिया भाटीया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पुजा वस्राकर, अरुंधती रेड्डी, नुझत परवीन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 4:51 pm

Web Title: harmanpreet kaur to captain india in womens t20 world cup psd 91
Next Stories
1 Ind vs Aus : जाणून घ्या कांगारुंच्या मनात धडकी भरवणाऱ्या ५ भारतीय खेळाडूंबद्दल…
2 हार्दिक पांड्या फिटनेस टेस्टमध्ये नापास, ‘भारत अ’ संघातलं स्थान गमावलं
3 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : अस्मीचा ‘सुवर्णचौकार’
Just Now!
X