भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने, विंडीजमध्ये सुरु असलेल्या महिला टी-20 विश्वचषकात इतिहासाची नोंद केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळत असताना हरमनप्रीतने शतक झळकावलं. टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 34 धावांनी मात करत स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे.

हरमनप्रीतने 51 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. हरमनप्रीतच्या खेळीत 8 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. मुंबईकर जेमिया रॉर्ड्रीग्जने हरमनप्रीतला 59 धावांची अर्धशतकी खेळी करुन चांगली साथ दिली. या खेळाच्या जोरावर भारतीय महिलांनी 5 विकेटच्या मोबदल्यात 194 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या सुएझ बेट्सने अर्धशतकी खेळी केली, मात्र आपल्या संघाचा पराभव ती टाळू शकली नाही. न्यूझीलंडचा संघ 160 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

अवश्य वाचा – WWT20 IND vs NZ : हरमनप्रीतचे विक्रमी शतक, न्यूझीलंडचा ३४ धावांनी पराभव