पंजाबच्या हरमिलन कौर बैन्सनं ६० व्या राष्ट्रीय ओपन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १५०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली आहे. २१ वर्षीय हरमिलने चार मिनिटं ५ सेंकदात अंतर पार केलं. यापूर्वी सुनीता राणीनं चार मिनिंटं ६ सेकंदात अंतर पार करत स्पर्धा जिंकली होती. बुसानच्या २००२ अशियाई स्पर्धेत हा विक्रम प्रस्थापित केला होता.

हरमिलनने ४:०५:३९ सेंकदात १५०० मीटर अंतर पार करत विक्रम आपल्या नावावर केला आहे. “मी आता मोकळपणाने धावू शकते”, असं हरमिलन कौर हीने सांगितलं. हरमिलनच्या घरात दोन क्रीडापटू आहेत. हरमिलन धावपटू अमनदिप सिंह आणि धावपटू माधुरी सिंह यांची मुलगी आहे. त्यामुळे तिच्यावर अपेक्षांचं ओझं होतं. मात्र हे दडपण दूर करत तिने ही कामगिरी केली आहे. विशेष हरमिलनने वारंगलपर्यंत एकटी आली होती. तिचे वडील काही दिवसांनी आले आणि प्रेक्षकांप्रमाणे स्टॅण्डवरून शर्यत पाहिली. “त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रशिक्षकही दडपणाखाली होते. ते प्रत्येक बारकावे जवळून बघत होते. प्रत्येक तपशीलाबाबत ते सल्ला द्यायचे. त्यामुळे दडपण असायचं. त्यामुळे स्वत: इथे आली”, असं हरमिलन कौर हीने सांगितलं. “माझ्या प्रशिक्षकांनी पालकांची समजूत घातली. त्यानंतर सतत देखरेख करण्याचं त्यांनी थांबवलं. मला मोकळेपणा हवा आहे, असा त्यांचा सिद्धांत होता.”, असं हरमिलनने पुढे सांगितलं.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

“स्पर्धेनंतर अमनदीप यांनी सुवर्णपदकासह मुलीसोबत सेल्फी घेतला. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. मात्र यावेळेही तिने वडिलांना सल्ला ऐकला नाही, हे विशेष. अपेक्षेशिवाय धावणं हे राष्ट्रीय चॅम्पियन बनण्याचं मुख्य कारण आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ४:१४:६८ असा तिची कामगिरी होती. आता हरमिलननं तिची कामगिरी १० सेकंदांनी सुधारली आहे. वजन कमी करत वेगावर लक्ष केंद्रीत केलं. त्याची तिला मदत झाली.”, असं प्रशिक्षक सैनी यांनी सांगितलं.