19 September 2020

News Flash

हरयाणा हॅमर्सची विजेतेपदाला गवसणी

६-३ असा पराभव करून प्रो कुस्ती लीगच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचूनही विजेतेपदाने कायम हुलकावणी दिलेल्या हरयाणा हॅमर्सचे प्रो कुस्ती लीगच्या जेतेपदाचे स्वप्न अखेर साकार झाले. हरयाणा हॅमर्सने पंजाब रॉयल्सचा ६-३ असा पराभव करून प्रो कुस्ती लीगच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

हरयाणा हॅमर्सकडून अलेक्झांडर खोट्सीयानिवस्की, अली शाबानोव्ह, किरण, रवी कुमार आणि अ‍ॅनास्तेशिया निचिता यांनी दमदार कामगिरी करत पंजाब रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या पाच लढती जिंकून विजेतेपदावर मोहोर उमटवली.

विशेष म्हणजे, हरयाणा हॅमर्सचा अव्वल खेळाडू बजरंग पुनिया मैदानावर उतरण्याआधीच त्यांनी विजेतेपद निश्चित केले होते. अखेर आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या बजरंगने रजनीशवर ११-० असा दमदार विजय नोंदवला. पंजाब रॉयल्सकडून अमित धानकर आणि अंजू यांनी विजय मिळवले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:51 am

Web Title: haryana hammers beat punjab royals to win pwl
Next Stories
1 भारतीय रेल्वेला विजेतेपद
2 Budget 2019 : अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी २१४ कोटींची वाढ!
3 Video : अफगाणिस्तानच्या शहझादने केला Dhoni Style रन आऊट
Just Now!
X