प्रो कबड्डी लीग

विकास खंडोलाच्या चतुरस्र चढायांच्या बळावर प्रो कबड्डी लीगमध्ये हरयाणा स्टीलर्सने पुणेरी पलटणचा ४१-२१ असा पराभव केला. विकासने चढायांचे ११ गुण मिळवत हरयाणाला गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर नेले.

क्रांतिरावा इनडोअर स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात हरयाणाने सर्वच आघाडय़ांवर पुण्याला नतमस्तक केले. नितीन तोमरने पुण्याचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्न केले. पंकज मोहितेनेही ७ गुण मिळवत छाप पाडली. परंतु धरमराज चेरलाथनच्या (५ गुण) दिमाखदार बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. दुसऱ्या लढतीत तेलुगू टायटन्सने तमिळ थलाव्हाजचा ३५-३० असा पराभव केला. तेलुगू टायटन्सकडून सिद्धार्थ देसाईने दिमाखदार चढाया करीत ९ गुण मिळवले, तर विशाल भारद्वाजने सहा पकडींचे गुण मिळवले. तमिळ थलायव्हाज संघाकडून व्ही. अजित कुमारने १४ गुण मिळवत लक्ष वेधले.