News Flash

भारताचा सराव सामना : हसीब हमीदची शतकी खेळी

उमेश यादवच्या माऱ्यासमोर कौंटी सिलेक्ट एकादशची सुरुवात निराशाजनक झाली.

चेस्टर-ले-स्ट्रिट : भारताचा पहिला डाव ३११ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर कौंटी सिलेक्ट एकादश संघाच्या हसीब हमीदने (११२) शतक साकारत यजमानांचा डाव सावरला. सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांसमोर यजमानांनी शरणागती पत्करल्यामुळे कौंटी संघाला २२० धावा करता आल्या. उमेश यादवच्या माऱ्यासमोर कौंटी सिलेक्ट एकादशची सुरुवात निराशाजनक झाली. पण ४ बाद ५६ अशी यजमानांची अवस्था असताना हमीदने  लिंडन जेम्सच्या साथीने पाचव्या गड्यासाठी ७५ धावांची भागीदारी रचली. लियाम पॅटरसन-व्हाइटने ३३ धावांची झुंज दिल्यामुळे कौंटी सिलेक्ट एकादशला दोनशे धावांचा पल्ला पार करता आला. भारताकडून उमेश यादवने तीन तर मोहम्मद सिराजने दोन बळी मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 2:02 am

Web Title: haseeb hameed century in india practice match akp 94
Next Stories
1 सुवर्णपदकासाठी सिंधू दावेदार
2 IND vs ENG : इंग्लंडच्या कसोटी संघाची घोषणा, शिक्षा मिळालेला खेळाडू संघात परतला
3 ICC Rankings : धवनला फायदा आणि बाबरला संधी!
Just Now!
X