पदार्पणातच आपल्या वेगळ्या शैलीची आणि उत्तम खेळाची छाप सोडणाऱ्या १९ वर्षीय इंग्ंलडच्या कसोटीपटू हसीब हमीदचे आणि विराट कोहलीचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. पदार्पणातच दुसऱ्या डाव्यात त्याने ८२ धावा केल्या.

त्याच्या या खेळाची सर्वत्र चर्चा झाली. तीन मॅच खेळल्यानंतर तो गंभीर झाला. त्याच्या जखमेबद्दल आणि विराट कोहलीसोबत झालेल्या त्याच्या भेटीबद्दल त्याने माध्यमांशी गप्पा मारल्या. त्याच्या बोटाला गंभीर जखम झाली होती. तरीदेखील त्याने मोहालीत अर्धशतक मारले. इंग्लंडने ही कसोटी हारली परंतु त्याच्या खेळाचे सर्वत्र कौतुक झाले. मॅच हरले तरी हसीबने सर्वांची मने जिंकली होती.

मला जखम झाल्यानंतर मला अतोनात दुःख झाले. सुरुवातीच्याच काळात असे होणे क्लेशदायक असते. जखमेची तीव्रता कमी होण्यासाठी मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि कोचच्या मदतीने माझे नेट प्रॅक्टिस सुरू ठेवली.
सराव करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कमी त्रास कसा होईल या पद्धतीने हातांचा वापर करायचा आणि त्यातूनच मी सामन्याला सामोरे गेलो. मला ही कसोटी मालिका पूर्ण खेळायची होती. परंतु, माझ्या जखमेमुळे मला दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले ही खंत त्याने व्यक्त केली.
अॅड्रेनिलिन आणि काही पेन किलर्सच्या साहाय्याने मी खेळण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांना देखील मी माझी गरज सांगितली. टेस्टमध्ये मी खेळून माझ्या संघासाठी काही योगदान देऊ शकतो का याबाबत मी विचारणा केली. परंतु, त्याने साफ सांगितले की तुला विश्रांतीची गरज आहे.
विराट कोहलीसोबतच्या भेटीबद्दल तो भरभरुन बोलला. विराट कोहलीसोबतची भेट हा अवर्णणीय अनुभव होता असे तो म्हणाला. विराट कोहलीप्रमाणेच तीनही प्रकारात आपली खेळण्याची इच्छा असल्याचे त्याने बोलून दाखवले. विराट कोहली हा महान फलंदाज आहे. तो ज्याप्रमाणे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये खेळतो त्याप्रमाणे माझी खेळण्याची इच्छा आहे. विराटप्रमाणे तीनही प्रकारांवर पकड मिळविण्याचे माझे स्वप्न आहे असे हसीब म्हणाला.
विराट कोहलीने तो प्रत्येक प्रकाराला कसे सामोरे जातो याचे गुपित उलगडून दाखवले. हा सर्व माइंड गेम असल्याचे त्याने म्हटले. मनाचे संतुलन राखून प्रत्येक खेळाला सामोरे जायला पाहिजे असा सल्ला विराटने आपल्याला दिल्याची माहिती हसीबने दिली.