भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ तिच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा तिला यामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. हसीन जहाँने ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केल्यावर सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर तिला कट्टरतावाद्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आणि सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या.
हसीन जहाँने नुकतात इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. ‘५ ऑगस्ट रोजी जेव्हा आयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. तेव्हा मी देशातील हिंदू लोकांना शुभेच्छा दिल्या. कारण हिंदू देखील मुस्लिमांना सणांच्या शुभेच्छा देतात. पण काही कट्टरतावाद्यांना हे आवडले नाही. त्यांनी मला सोशल मीडियावर जिवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी दिली. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आमित शाह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करते की, त्यांनी यावर कारवाई करावी. आपण सर्वधर्म समान या भावनेनं राहणाऱ्या देशात राहतो’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय होती हसीन जहाँची पोस्ट?
हसीन जहाँने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने राम मंदिराचा फोटो आणि प्रभू श्रीराम यांचा फोटो शेअर केला होता. या फोटोवर आयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या समस्त हिंदू समाजाला शुभेच्छा असे म्हटले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 3:29 pm