स्थानिक खेळाडू मेरी अ‍ॅन गोम्स हिने तानिया सचदेव व सौम्या स्वामीनाथन यांना माध्यम गुणांच्या आधारे मागे टाकले आणि महिलांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साकारली.
या स्पर्धेत गोम्स, सचदेव व सौम्या यांचे ११व्या फेरीअखेर प्रत्येकी साडेसात गुण झाले. माध्यम गुणांच्या आधारे गोम्सने विजेतेपदाबरोबरच पावणेदोन लाख रुपयांचे पारितोषिकही मिळविले. सचदेव व सौम्या यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळाले. पद्मिनी राऊत व स्वाती घाटे यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकाविला. शेवटच्या फेरीत राऊत हिने सौम्यास पराभवाचा धक्का दिला तर मेरी गोम्सने इव्हाना फर्टाडोविरुद्ध बरोबरी स्वीकारली. सचदेव हिने बोडा प्रत्युषा हिच्यावर मात केली.