ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताने हातात आलेला सामना गमावला. अखेरच्या षटकात सामना जिंकण्यासाठी भारताला 14 धावा रोखणं गरजेचं होतं, मात्र उमेश यादवला अशी कामगिरी करणं जमलं नाही. 3 गडी राखून ऑस्ट्रेलियाने सामन्यात बाजी मारत, 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र या पराभवानंतरही अष्टपैलू कृणाल पांड्याने उमेद सोडली नसून, भारत मालिकेत दमदार पुनरागमन करेल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. मात्र याचवेळी भारताला फलंदाजीमध्ये सुधारणा करणं गरजेचं असल्याचंही कृणाल म्हणाला.
“पहिल्या सामन्यात सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. 126 धावांसारखं कमी लक्ष्य असतानाही आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ऑस्ट्रेलियाला चांगली टक्कर दिली होती. फक्त आम्हाला फलंदाजीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यात आम्ही दमदार पुनरागमन करु याची मला खात्री आहे. आम्ही मालिका अजुन गमावलेली नाहीये.” 27 वर्षीय कृणाल दुसऱ्या टी-20 सामन्याआधी पत्रकारांशी बोलत होता.
अवश्य वाचा – विश्वचषकासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी सज्ज – मोहम्मद शमी
बुधवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा टी-20 सामना रंगणार आहे.
अवश्य वाचा – IPL दरम्यान वाईट सवयी लावून घेऊ नका, विराटने सहकाऱ्यांना बजावलं
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 4:02 pm