IPL मुळे भारतीय खेळाडूंना खूप मोठा चाहता वर्ग मिळाला. त्याचप्रमाणे भारतीय चाहत्यांनीही अनेक परदेशी खेळाडूंना आपलंसं केलं. शेन वॉटसन हे त्यातलंच एक नाव. भारताविरूद्ध शेन वॉटसन चांगली खेळी केल्यावर त्याला मनातल्या मनात शिव्या देणारे चाहते IPL नंतर मात्र त्याच्या आणि इतर अनेक परदेशी खेळाडूंच्या प्रतिभेचे चाहते झाले. विशेषत: महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघात वॉटसन दाखल झाल्यानंतर त्याचा चाहता वर्ग अजूनच वाढला. चेन्नईच्या या ‘रनमशिन’चा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सुशांतच्या आत्महत्येनंतर शेन वॉटसनही गहिवरला, म्हणाला…

ICC ने वॉटसनचा फोटो पोस्ट करत त्याची समृद्ध कारकिर्द चाहत्यांसमोर उलगडली आहे. वॉटसनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५९ कसोटी, १९० वन डे आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकूण १०,९५० धावा ठोकल्या आहेत. त्याशिवाय त्याने २९१ बळीदेखील मिळवले आहेत. वन डे कारकिर्दीत ५००० धावा आणि १५० पेक्षा अधिक बळी मिळवणारा वॉटसन हा केवळ दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. तसेच वॉटसन हा टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

ICC ने दिल्या शुभेच्छा

What a Man!… CSK च्या स्पेशल शुभेच्छा

“…तर मी इतर पाणी देत राहिलो असतो”

“चेन्नईच्या संघात १० सामन्यात तुम्ही चांगली कामगिरी न करताही तुम्हाला पुढील सामन्यात संधी मिळते. गेल्या वर्षी माझी कामगिरी चांगली झाली नव्हती, पण कर्णधार धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. इतर कोणत्याही दुसऱ्या संघात असतो, तर थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवला असता आणि इतर खेळाडूंना पाणी नेण्यासाठी सांगितलं असतं”, असे वॉटसनने सांगितले.