30 September 2020

News Flash

खेलरत्न पुरस्कार : सानिया, क्रीडा मंत्रालयाला उच्च न्यायालयाची नोटीस

प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्कारासाठी भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाचे नाव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने निश्चित केले आहे.

| August 27, 2015 02:53 am

प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्कारासाठी भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाचे नाव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने निश्चित केले आहे; परंतु पॅरालिम्पिकपटू एच. एन. गिरिशाने या पुरस्कारावर दावा केल्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयाने क्रीडा मंत्रालय आणि सानियाला नोटीस बजावली आहे.
गिरिशाने दाखल केलेल्या याचिकेवर ए. एस. बोपण्णा यांनी नोटीस जारी केली असून, १५ दिवसांत त्याला उत्तर देण्यास सांगितले आहे. जूनमध्ये सानियाने मार्टिना हिंगिसच्या साथीने विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घातली. सानियाने महिला दुहेरीतील हे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने सानियाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली. त्यानंतर क्रीडा मंत्रालयानेही या शिफारसीवर शिक्कामोर्तब केले.
क्रीडा दिनाचे औचित्य साधून २९ ऑगस्टला राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारची गुणदान पद्धती अस्तित्वात असताना गिरिशाचे नाव डावलून सानियाच्या नावाला का पसंती देण्यात आली, अशी विचारणा करणारी ही याचिका आहे. पॅरालिम्पिक क्रीडा स्पध्रेत पदक विजेत्या गिरिशाने आपल्या याचिकेत या पुरस्कारासाठीची दावेदारी सिद्ध करताना गुणपद्धतीचा दाखला दिला आहे. गिरिशाने आपल्या कामगिरीचे सर्वाधिक ९० गुण होतात, तर सानिया गुणांमध्ये बरीच पिछाडीवर आहे, असे म्हटले आहे. सरकारच्या खेलरत्न पुरस्कारासाठीच्या नियमावलीत विम्बल्डन दुहेरीतील विजेतेपदाला स्थान देण्यात आलेले नाही. २०११नंतर झालेल्या ऑलिम्पिक, परॉलिम्पिक, आशियाई किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, विश्व अजिंक्यपद स्पर्धा यातील कामगिरी पुरस्कारासाठी ग्राह्य मानली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 2:53 am

Web Title: hc issues notice to govt sania on khel ratna issue
टॅग Sania
Next Stories
1 जागतिक मैदानी स्पर्धा : टिंटू लुकाची ऑलिम्पिकवारी पक्की
2 सिंक्वेफिल्ड बुद्धिबळ स्पर्धा : आनंदची बरोबरी
3 श्रीलंकेचे खेळाडू फिरकीच्या जाळ्यात ;जयसूर्याचे परखड मत
Just Now!
X