पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज उमर अकमल याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. मॅच फिक्सिंगप्रकरणी तो दोषी आढळला असून त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख फैजल इ मिरान चौहान यांनी त्याला तीन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठवली आहे. या काळात त्याला क्रिकेटची संबंधित कोणत्याही गोष्टीत सहभागी होता येणार नाही.

सट्टेबाजीसाठी शाकीबशी संपर्क साधणाऱ्या संघ मालकावर ICC कडून बंदी

उमर अकमल वर घालण्यात आलेल्या बंदीच्या निर्णयावरून विविध प्रतिक्रिया उमटल्या नंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू झुलकरनैन हैदर याने एक गौप्यस्फोट केला आहे. उमर अकमल ड्रिंक्स ब्रेक दरम्यान आणि इतर वेळी पाणी घेऊन येण्याच्या बहाण्याने मैदानावर यायचा आणि खेळाडूंना मुद्दाम वाईट कामगिरी करायला सांगायचा, असा आरोप त्याने केला आहे. हैदर स्पष्टपणे म्हणाला की उमर अकमल वर झालेल्या बंदीच्या कारवाईचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. उलट अशा खेळाडूंवर आजन्म क्रिकेटबंदी घालायला हवी. मी हे स्वानुभवाने सांगतो.

“बुमराह अजूनही ‘बच्चा’ आहे” म्हणणारा पाकिस्तानी क्रिकेटर आता म्हणतो…

लॉकडाउन स्पेशल… रोहितने भन्नाट कमेंट करत युवराजला केलं ट्रोल

हैदरने अकमल च्या मॅच फिक्सिंगच्या गोष्टीबाबत बोलताना एक किस्सा सांगितला. “२ नोव्हेंबर २०१० मध्ये आम्ही आफ्रिकेसोबत दुबईच्या मैदानावर खेळत होतो. तो सामना अत्यंत महत्त्वाचा होता. दोनही संघ सामना जिंकण्यासाठी खेळत होते. त्यावेळी मी फलंदाजी करत असताना उमर अकमल पाणी देण्याच्या बहाण्याने मैदानावर आला आणि त्याने मला खराब फलंदाजी करायला सांगितली. ‘वाईट कामगिरी कर’ हे त्याचे शब्द मला आजही आठवत आहेत. त्यावर मी त्याला म्हंटलं होतं की तू पाणी देण्यासाठी आला आहेस. तेवढ्यापुरताच मर्यादित राहा” असे हैदर म्हणाला.

रोहितचा २६४ धावांचा विक्रम कोण मोडणार? श्रीसंतने दिलं उत्तर

“त्या सामन्यानंतर मला धमकवण्यात आले. ते दडपण मला असह्य झाल्याने मी इंग्लंडला पळून गेलो. मी ही दिवसांनी जेव्हा इंग्लंडहून परतलो तेव्हा मी याबाबत अधिकारी वर्गाला कल्पना दिली.” अशी माहिती हैदरने दिली.

तसेच, हैदरने ही घटना घडल्यावर लगेचच ९ नोव्हेंबर २०१० ला निवृत्ती जाहीर केली.