विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ गडी राखून मात केली. विंडीजने विजयासाठी दिलेलं २०८ धावांचं आव्हान भारतीय संघाने विराट कोहलीच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर पूर्ण केलं. विराट कोहलीने ५० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने ९४ धावा केल्या.

अवश्य वाचा – IND vs WI : विराटचा शाहिद आफ्रिदीला धोबीपछाड, मिळवलं दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान

विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड विराटच्या या खेळावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. “विराट कोहली हे एक वेगळ्याच प्रकारचं रसायन आहे. तो दिग्गज फलंदाज आहे. प्रत्येकवेळी त्याने आपल्या खेळीमधून हे सिद्ध करुन दाखवलं आहे. मैदानात त्याने जे काही केलं हे नेमकं काय होतं मला सांगता येणार नाहीत, पण हा देखील खेळाचाच एक भाग आहे.” पोलार्ड विराट कोहली आणि केजरिक विल्यम्समध्ये मैदानात रंगलेल्या द्वंद्वाविषयी बोलत होता.

अवश्य वाचा – Video : ….आणि विराटने भर मैदानात विल्यम्सच्या डायरीतली पानं फाडली

पहिल्या विजयासह भारताने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना ८ डिसेंबरला तिरुअनंतरपुरमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराला विराटने टाकलं मागे