आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हेल्मेट संबंधी नवीन नियम जाहीर केला आहे. पाठीमागच्या बाजूने जास्त संरक्षण असणारे हेल्मेट वापरण्यात यावेत अशी सूचना आयसीसीने जारी केली आहे. हा नवा नियम १ फेब्रुवारी २०१७ पासून लागू करण्यात येणार आहे. ब्रिटिश स्टॅंडर्ड बीएस ७९२८:२०१३ हे मानांकन असणाऱ्या हेल्मेटच वापरावेत अशी मार्गदर्शक सूचना आयसीसीने जाहीर केली आहे. या हेल्मेटला ग्रिल आणि पीकच्या मध्ये कमी अगदी कमी अंतर असते त्यामुळे बॉल पासून जास्त संरक्षण मिळते.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात सुरक्षित हेल्मेटचा वापर व्हावा अशी आमची इच्छा आहे असे आयसीसीचे संस्थापक जेफ अलार्डिस यांनी म्हटले. जुन्या हेल्मेटपेक्षा नवे हेल्मेट्स हे अधिक सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले. हेच हेल्मेट वापरण्यात यावे याला आमचे प्राधान्य आहे असे जेफ यांनी म्हटले. बऱ्याच संघांनी हे नवे हेल्मेट वापरण्यास १ जानेवारीपासून सुरुवात केली आहे. परंतु काही संघ आणि खेळाडू अद्यापही हे वापरत नसल्याचे आढळून आले आहे तेव्हा त्यांनी याकडे लवकर लक्ष देणे आवश्यक आहे असे जेफ म्हणाले.

Recruitment for assistant professor post
मुंबईच्या TISS मध्ये ‘या’ पदासाठी भरती होणार! २८ एप्रिलआधी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
ssc je recruitment 2024 for 968 junior engineer
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ‘या’ पदांसाठी मेगा भरती! १८ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज
BOI Officer Recruitment 2024 Interested individuals can apply online through the official website until April Three
BOI Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, आजचं करा अर्ज

काही संघांनी आमच्याकडे वेळ देखील मागितला आहे. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून हे हेल्मेट वापरावेत अशी सूचना आम्ही जारी केली असल्याचे जेफ म्हणाले. १ फेब्रुवारीनंतर आम्ही या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करणार आहोत असे जेफ यांनी म्हटले. मागील वर्षी जूनमध्ये ब्रिटिश सेफ्टी स्टॅंडर्डचे हेल्मेट वापरावे असा निर्णय घेण्यात आला होता. इंग्लंडमध्ये या हेल्मेटची सक्ती नोव्हेंबर २०१५ पासूनच आहे.

नोव्हेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन कसोटीपटू फील ह्युजेसला मैदानावर खेळताना बॉल लागल्यामुळे मृत्यू झाला होता. त्याचे हेल्मेट हे जुन्या मॉडलचे होते. त्या कंपनीने नवीन मॉडल तयार केले होते ते अधिक सुरक्षित होते परंतु ह्युजेस आपले जुनेच हेल्मेट वापरत होता. एक उसळता चेंडू येऊन त्याच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर ह्युजेस कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची झुंज अयशस्वी ठरली आणि त्याचे रुग्णालयात निधन झाले. या घटनेनंतर जगभरातील क्रिकेट संघटनांनी हेल्मेट हे अधिकाधिक सुरक्षित व्हावेत आणि वेळेनुसार ते अद्ययावत व्हावे अशी इच्छा जाहीर केली.