News Flash

हेमांग अमिन बीसीसीआयचे हंगामी सीईओ

माजी CEO राहुल जोहरींचा राजीनामा

राहुल जोहरी यांचा सीईओ पदाचा राजीनामा स्विकारल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे Chief Operating Officer हेमांग अमिन यांची बीसीसीआयच्या हंगामी सीईओ पदावर नियुक्ती केली आहे. पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत बीसीसीआयने सीईओ पदावर नवीन नियुक्ती करणं अपेक्षित आहे. २०१७ पासून हेमांग अमिन आयपीएलमध्ये Chief Operating Officer पदावर काम करत आहेत.

२०१६ साली बीसीसीआयने सीईओ पदावर नेमणुकीसाठी प्रोफेशनल एजन्सीची मदत घेतली होती. मात्र राहुल जोहरी यांच्या नियुक्तीनंतर अनेक वादंग निर्माण झाले होते. त्यामुळे यंदा बीसीसीआय आपल्याचपैकी एका अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १७ जुलै रोजी बीसीसीआयच्या वरिष्ठ कार्यकारणीची बैठक होणार आहे. यात नवीन सीईओ नेमणुकीचा मुद्दा चर्चेसाठी येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सीईओ पदासाठी बीसीसीआय जाहीरात काढेल अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 1:53 pm

Web Title: hemang amin appointed bccis interim ceo psd 91
Next Stories
1 फुटबॉलपटूच्या स्वप्नांना करोनाची ‘किक’, लॉकडाउनमध्ये रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ
2 ऋषभ पंत सातत्याने अपयशी का ठरतो? माजी खेळाडूने सांगितलं कारण
3 युवराजने ‘स्पेशल’ आठवण शेअर करत माजी कर्णधाराला केलं ट्रोल
Just Now!
X