अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या २०१९ क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक आज आयसीसीने जाहीर केलं आहे. आगामी वर्षात इंग्लंडमध्ये हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. बुधवारी ESPNCricinfo या संकेतस्थळावर विश्वचषकाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं. मात्र आयसीसीने आज आपल्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करत क्रीडा रसिकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम दिला आहे,

या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे, तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत १६ जुनला मैदानात उतरणार आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेतले सामने हे रॉबिन-राऊंड पद्धतीने खेळवले जाणार आहे. या प्रकारात प्रत्येक संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्याविरोधात एक सामना खेळणार आहे. यानंतर सर्वोत्तम ४ संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत.

२०१९ विश्वचषकाचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ जून

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ९ जून

भारत विरुद्ध न्यूझीलंड – १३ जून

भारत विरुद्ध पाकिस्तान – १६ जून

भारत विरुद्ध अफगाणिस्तान – २२ जून

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – २७ जून

भारत विरुद्ध इंग्लंड – ३० जून

भारत विरुद्ध बांगलादेश – २ जुलै

भारत विरुद्ध श्रीलंका – ६ जुलै