भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले. इटलीमध्ये झालेल्या या लग्न सोहळ्यात फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. डेस्टिनेशन वेडिंगनंतर विराट- अनुष्काने दिल्ली आणि मुंबईमध्ये मित्र- मैत्रिणी आणि इतर नातेवाईकांसाठी रिसेप्शन ठेवले होते.

लग्नानंतर लगेच विराट आणि अनुष्का आपआपल्या कामात मग्न झाले. नुकतेच विराटला मुंबई विमानतळावर पाहण्यात आले. दक्षिण आफ्रिकेतील सामन्यांनंतर भारतात परतलेला विराट पत्नी अनुष्काला घ्यायला विमानतळावर आला होता. तेव्हा एका छायाचित्रकाराने त्याचा मोबाइलमध्ये पाहतानाचा व्हिडिओ घेतला. त्याने आपल्या मोबाइलच्या वॉलपेपरवर अनुष्काचाच फोटो लावला आहे. असे म्हटले जाते की विराटने दिल्ली रिसेप्शनमधील अनुष्काचा फोटो वॉलपेपर म्हणून लावला आहे.

https://www.instagram.com/p/BgHRsgDH5Bg/

कोहलीच्या एका फॅन पेज इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याआधी विराटने त्याच्या नवीन घराचा एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला होता. लग्नानंतर विराटने दिल्ली सोडून मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला होता. म्हणूनच लग्नाआधी विराटने हे घर मुंबईत घेतले होते. विराटने या घराचा फोटो शेअर करताना म्हटले की, ‘जर तुमच्या घरातूनच एवढे चांगले दृश्य दिसत असेल तर तुम्ही दुसरीकडे कुठे का जाल.’ विराटने हा फोटो घराच्या गॅलरीमधून काढला आहे.

https://www.instagram.com/p/BgEAtF2Afli/

https://www.instagram.com/p/BckS2N4gsql/