News Flash

कार्लिग चषक फुटबॉल स्पर्धा : मँचेस्टर युनायटेडचा लिव्हरपूलवर विजय

१० सामन्यांच्या बंदीची शिक्षा भोगून मैदानावर उतरणाऱ्या लिव्हरपूलच्या लुइस सुआरेझच्या यशस्वी पुनरागमनावर मँचेस्टर युनायटेडच्या झेव्हियर हेर्नाडेझने पाणी फेरले.

| September 27, 2013 04:43 am

कार्लिग चषक फुटबॉल स्पर्धा : मँचेस्टर युनायटेडचा लिव्हरपूलवर विजय

१० सामन्यांच्या बंदीची शिक्षा भोगून मैदानावर उतरणाऱ्या लिव्हरपूलच्या लुइस सुआरेझच्या यशस्वी पुनरागमनावर मँचेस्टर युनायटेडच्या झेव्हियर हेर्नाडेझने पाणी फेरले. हेर्नाडेझने ४६व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने लीग चषक (कार्लिग) फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपूलवर १-० असा विजय प्राप्त केला. या विजयासह मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीगमधील पराभवाचा वचपा काढला. अन्य सामन्यांत, बर्मिगहॅमने स्वानसी सिटीचा ३-१ असा पराभव केला. बर्मिगहॅमकडून डॅन बर्न (५७व्या मिनिटाला), मॅट ग्रीन (६१व्या मिनिटाला) आणि टॉम अडेयेमी (८१व्या मिनिटाला) यांनी गोल केले. स्वानसी सिटीकडून विल्फ्रेड बोनी (९०व्या मिनिटाला) याने एकमेव गोल केला. न्यूकॅसलने लीड्सचा २-० असा सहज पाडाव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2013 4:43 am

Web Title: hernandez steels suarez limelight as manchester united beat liverpool
Next Stories
1 आशिया चषक हॉकी : भारतीय महिलांच्या विश्वचषकाच्या आशा संपुष्टात
2 धोनीचा हैदराबादला तडाखाधोनीचा हैदराबादला तडाखा
3 इंडिया ब्ल्यूने दिल्ली जिंकले!
Just Now!
X