महिला ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टरचे पहिले नॉर्म प्राप्त

भारताच्या दिव्या देशमुखने व्हेलामन-एआयसीएफ महिला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत दोन विजयांसह नवव्या फेरीअंती एकूण सात गुणांसह एकटीने आघाडी घेतली आहे. नागपूरच्या दिव्याने या विजयांसह आंतरराष्ट्रीय मास्टर आणि महिला ग्रँडमास्टर असे दोन्हीचे पहिले नॉर्म प्राप्त केले आहे.

चेन्नईच्या पी. मिशेले कॅथरिना हिने नऊपैकी साडेसहा गुण मिळवत पहिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला आहे. युक्रेनची ओस्माक लुइल्जासह ती दुसऱ्या स्थानावर आहे. मिशेलने आकांक्षा हगवणेविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. दिव्याने युक्रेनची महिला ग्रँडमास्टर ओल्गा बॅबी आणि मोंगोलियाच्या युरिंटुया उरुत्शेखवर विजय मिळवला. दिव्याची बॅबीविरुद्धची लढत चार तास आणि २० मिनिटे चालली. ९२ चालींनंतर तिला हा विजय प्राप्त झाला.