News Flash

उच्च न्यायालयाचा शरद पवारांना तूर्त दिलासा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष शरद पवार यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या

| December 3, 2013 02:37 am

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष शरद पवार यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यास दिवाणी न्यायालयाने केलेल्या मज्जावास उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती देत तूर्त दिलासा दिला.
मुंबईचे कायमस्वरूपी निवासी असलेल्यांनाच एमसीएची निवडणूक लढविता येते, असे सांगत गोपीनाथ मुंडे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळून लावला होता. मुंडे यांच्या निवडणूक ओळखपत्रावर त्यांचा निवासी पत्ता बीडचा आहे. त्याविरोधात मुंडेंनी न्यायालयात धाव घेत हा निर्णय रद्द करण्याची तसेच पवारांना अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापासून मज्जाव करण्याची मागणी केली होती. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शर्मा यांनी पवारांना अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यास प्रतिबंध केला होता. त्या विरोधात पवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायमूर्ती अनूप मोहता यांच्यासमोर सोमवारी त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला १७ डिसेंबपर्यंत स्थगिती देत याचिकेवरील सुनावणी १३ डिसेंबर रोजी ठेवली.
दिवाणी न्यायालयाने मुंडे यांना दिलासा देताना ‘एमसीए’ आणि अन्य प्रतिवाद्यांना १५ दिवसांत लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दावा कुठल्या मुद्दय़ांवर चालविण्यात यावा हे ठरविण्याचे आणि दरदिवशी दाव्याची सुनावणी घेऊन तीन महिन्यांत त्यावर निर्णय देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. मात्र या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्यास १५ दिवसांची मुदत देण्याची मागणी ‘एमसीए’ने केली होती. ही विनंती उच्च न्यायालयाने मान्य केली.
मात्र अपील करण्यासाठी सात दिवसांचीच मुदत दिली होती. ती मुदत सोमवारी संपली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 2:37 am

Web Title: high court comfort sharad pawar for now in mca issue
टॅग : Sharad Pawar
Next Stories
1 एमसीएकडून सचिनचा आज सत्कार
2 मुंबईच्या रणजी संघात प्रवीण तांबे
3 ला लिगा फुटबॉल स्पर्धा : बार्सिलोनाला पराभवाचा धक्का
Just Now!
X